परत एकदा मलायका अरोरा हिच्यासोबत अरबाज खान याला बांधायची होती लग्न गाठ
सुरूवातीला या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या.
मुंबई : मलायका अरोरा कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मात्र, असे असूनही हे दोघे अनेकदासोबत स्पाॅट होतात. या दोघांचा अरहान खान नावाचा एक मुलगा देखील आहे. सुरूवातीला या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यावर मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न करणार आहेत.
काही वर्षांपूर्वी अरबाज खान हा साजिद खान याच्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अरबाज खान म्हणाला होता की, लग्नाच्या 25 व्या वर्षी मला परत एकदा मलायका अरोरा हिच्यासोबत लग्न करायचे आहे.
आता अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट होऊन अनेक वर्ष झाले आहेत. दोघेही आपल्या आयुष्यामध्ये बरेच पुढे गेले आहेत. मात्र, याच महिन्यात मलायका आणि अरबाज खान यांच्या लग्नाला तब्बल 24 वर्ष पुर्ण होत आहेत.
पुढच्या वर्षी मलायका आणि अरबाज खान यांच्या लग्नाला 25 वर्ष पुर्ण होतात. यामुळेच साजिद खानच्या शोमधील मलायका आणि अरबाज यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी अफवा पसरल्या होत्या की, मलायका अरोरा ही अर्जुन कपूर यांच्या बाळाची आई होणार आहे. मात्र, या सर्व अफवा असल्याचे कळाले. यावर एक पोस्टही अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर शेअर केली होती.