Malaika Arjun Wedding: आमचंही ठरलंय! मलायका-अर्जुन ‘या’ महिन्यात लग्नबंधनात अडकणार

जवळपास गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने (Malaika) सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नातं जगजाहीर केलं होतं.

Malaika Arjun Wedding: आमचंही ठरलंय! मलायका-अर्जुन 'या' महिन्यात लग्नबंधनात अडकणार
Malaika Arora and Arjun KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 3:41 PM

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर आता अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरासुद्धा (Malaika Arora) लवकरच लग्नबंधनात (Marriage) अडकतील असं कळतंय. जवळपास गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नातं जगजाहीर केलं होतं. त्याआधी दोघांनीही माध्यमांपासून आपलं रिलेशनशिप लपवण्याचा प्रयत्न केला होता. आता लवकरच ही जोडी विवाहबद्ध होणार असल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मलायका अर्जुनबद्दल आणि त्याच्यासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली होती. अर्जुन आणि मलायकासुद्धा याच वर्षी आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत.

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात अर्जुन-मलायका लग्न करणार असल्याचं कळतंय. मुंंबईतच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते लग्नगाठ बांधतील. त्यानंतर मित्रपरिवारासाठी ते रिसेप्शनचं आयोजन करतील. अर्जुन आणि मलायकाचं नातं सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलं. यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे दोघांच्या वयातील अंतर. मलायका ही 48 वर्षांची असून अर्जुन हा 36 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. “प्रत्येक नात्यात पुढे काय होणार आणि कुठपर्यंत आपण सोबत जाणार याच्या योजना आधीच आखलेल्या असतात. भविष्यात आपण एकमेकांना एकत्र पाहतोय का हे माहित असणं सर्वांत महत्त्वाचं असतं. ‘अरे, पुढे काय होणार हे मला माहित नाही..’ असं कोणी म्हणणारं असेल तर त्या नात्यात मी नाही. मला असं वाटतंय की आम्ही आता अशा टप्प्यावर आहोत जिथे आम्ही नात्याच्या भविष्याचा विचार करतोय. आम्ही गोष्टींवर खूप चर्चा करतो. याबाबतीत दोघांचेही विचार आणि कल्पना सारखेच आहेत”, असं मलायका ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायकाने अभिनेता, निर्माता अरबाज खानशी 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2016 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आणि संपूर्ण प्रक्रिया 2017 मध्ये पूर्ण झाली. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....