Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

इतकेच नाही तर बॉलिवूड पार्ट्यांमध्ये हॉट स्टाईलमध्ये नेहमीच मलायका दिसते.

Video | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 9:28 AM

मुंबई : मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमधील एक महत्वाचे नाव आहे. मलायका कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. इतकेच नाही तर बॉलिवूड पार्ट्यांमध्ये हॉट स्टाईलमध्ये नेहमीच मलायका दिसते. मलायका आणि अर्जुन कपूर नेहमीच स्पाॅट होतात. हे दोघे विदेशातही फिरायला सोबतच जातात. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनला लग्न कधी करणार असल्याचा प्रश्न विचारला जातोय. त्यामध्ये मलायकाने एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, त्यानंतर यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले.

मलायकाने मी अखेर हो म्हणाले, अशा संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट पाहून अनेकांनी अंदाजा लावला होती की, मलायका अर्जुन कपूरला लग्नासाठी हो बोलली तर नाही ना? मात्र, ही पोस्ट मलायकाने ओटीटीसाठी केली असल्याचे नंतर पुढे आले. मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चाहते वाट पाहात आहेत.

https://www.instagram.com/reel/Ck3hzYdj53F/?igshid=MDJmNzVkMjY=

नुकताच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये दोघांनीही मॅचिंग ब्लॅक आउटफिट्स घातल्याचे दिसत आहे. दोघे रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना स्पाॅट झाले. यावेळी मलायकाचा एकदम बोल्ड लूक दिसत होता. इतकेच नाही तर अर्जुन पुढे येऊन थांबला आणि मलायकासाठी गाडीचे दार उघडले मलायका गाडीमध्ये बसल्यावर त्याने परत दार लावले. हे पाहून स्पष्ट दिसत आहे की, मलायकाची अर्जुन किती जास्त केअर घेतो.