चल छैया छैया गाण्यावरील डान्सने मलायका अरोरा आणि नोरा फतेही ट्रोल
या शोच्या माध्यमातून मलायका अरोरा हिने आता ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे.
मुंबई : बाॅलिवूडची बोल्ड क्वीन अर्थात मलायका अरोरा ही मूविंग इन विद मलाइका या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. मलायका हिने अखेर मी हो म्हटलेच…अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टनंतर सर्वजण वेगवेगळे अर्थ काढत होते. अनेकांना वाटले की, मलायका अरोरा हिने अर्जुन कपूरला लग्नासाठी होकार दिला. मात्र, मलायका अरोरा हिने होकार हा ओटीटी पदार्पणासाठी दिल्याचे कळले. मूविंग इन विद मलाइका या शोच्या माध्यमातून मलायका अरोरा हिने आता ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे.
मूविंग इन विद मलाइका या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच करण जोहर हा आला होता. यावेळी करण जोहर याने मलायकाची फिरकी घेण्याचा देखील प्रयत्न केला. इतकेच नाहीतर करण हा मलायकाच्या सेक्स लाईफबद्दल देखील प्रश्न विचारत होता.
आता मलायकाच्या शोमध्ये नोरा फतेही हजेरी लावणार आहे. इतेकच नाहीतर यावेळी दोघी चल छैया छैया या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसणार आहेत. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.
मलायका आणि नोरा यांचा चल छैया छैया या गाण्यावरील डान्स पाहून त्यांना आता सोशल मीडियावर ट्रोलर्स केले जात आहे. या गाण्यामध्ये या दोघींनी काही बोल्ड सीन केले आहेत.
छैया छैया हे गाणे दिल से या चित्रपटातील असून हा चित्रपट 1998 ला रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये मलायका अरोरा आणि शाहरुख खान यांनी चालत्या रेल्वेच्या डब्यावर हे डान्स केला असून आजही लोकांना हे गाणे मोठ्या प्रमाणात आवडते.
नोरा आणि मलायका यांनी केलेला चल छैया छैया गाण्यावरील डान्स लोकांच्या पचणी पडला नाहीये. छैया छैया गाण्यामध्ये नोरा आणि मलायका यांचा बोल्ड लूक दिसत आहे. या डान्समध्ये यांनी हॉट डान्स मूव्स देखील केल्या आहेत.
मलायका आणि नोराच्या डान्सला ट्रोल करत अनेकांनी शकीरा आणि बियोंसेची कॉपी केल्याचे देखील म्हटले आहे. आता नोरा आणि मलायका यांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.