शोमध्ये या व्यक्तीची खिल्ली उडवणे मलायका अरोरा हिला पडले महागात, शेवटी हात जोडून माफी…
मलायका अरोरा हिच्या शोमध्ये नोरा फतेहीपासून भारती सिंहपर्यंत अनेकांनी हजेरी लावलीये.
मुंबई : मलायका अरोरा ही सध्या तिच्या मूविंग इन विद मलाइका या शोमुळे चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये करण जोहर हा सहभागी झाला होता. करण याने मलायका हिच्या शोमध्ये येऊन मलायकाचीच फिरकी घेतली होती. इतकेच नाहीतर यावेळी करण चक्क मलायका हिला तिच्या सेक्स लाईफबद्दल देखील थेट प्रश्न विचारत होता. मात्र, मलायका हिने करण याला दणदणीत उत्तर देत सेक्स लाईफबद्दल सांगणे टाळते. मलायका अरोरा हिच्या शोमध्ये नोरा फतेहीपासून भारती सिंहपर्यंत अनेकांनी हजेरी लावलीये.
नुकताच मलायका हिच्या शोमध्ये तिचा मुलगा अरहान खान, बहीण अमृता अरोरा आणि आई सहभागी झाले आहेत. मात्र, मलायकाची बहीण अमृता अरोरा ही तिच्यावर यावेळी प्रचंड नाराज झाली. इतकेच नाहीतर एपिसोडमध्ये मलायका ही थेट अमृता अरोरा हिला माफी मागताना देखील दिसत आहे.
View this post on Instagram
शोमध्ये मलायका ही अमृता अरोरासोबत असा काही मजाक करते की, यामुळे अमृता अरोरा ही नाराज होते. शोमध्ये मलायका ही अमृताचा मजाक उडवताना दिसली. मात्र, हे अमृता अरोरा हिला अजिबात आवडत नाही. अमृता म्हणाली की, त्या दिवशी स्टँडअप कॉमेडी दरम्यान तू माझी खूप मजाक उडवली.
अमृता पुढे म्हणाली, तू जी मजाक उडवली ती मला अजिबातच आवडली नाहीये. माझ्याबद्दल तू जे काही बोलली, ते बोलण्याच्या अगोदर तू मला फोन किंवा मेसेज करून एकदा विचारायला हवे होते. तू नेहमीच माझ्या कपड्यांबद्दल मला टार्गेट केले आहेस.
मलायका मग अमृता हिला स्टँडअप कॉमेडीचे नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. परंतू अमृता ही मलायकाला म्हणते की तर वेळा मीच का? यावर मग अमृता अरोरा हिची माफी मागताना मलायका अरोरा दिसत आहे. आता चाहते या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत.