Malaika Arora | मलायका अरोरा हिने ‘अर्जुन कपूर’सोबतच्या लग्नाबद्दल केले मोठे विधान

| Updated on: Dec 29, 2022 | 8:56 PM

काही दिवसांपूर्वी या शोमध्ये करण जोहर याने हजेरी लावली होती.

Malaika Arora | मलायका अरोरा हिने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबद्दल केले मोठे विधान
Follow us on

मुंबई : मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मलायकाचे वय 49 असले तरीही एखाद्या 24 वर्षाच्या मुलीसारखा ग्लॅमरस लूक हा मलायका अरोराचा आहे. मलायकाचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी मलायका कायमच बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते. मलायका सध्या तिच्या मूविंग इन विद मलाइका हा शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये मलायका तिची पर्सनल लाईफबद्दल कायम शेअर करते. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये करण जोहर याने हजेरी लावली होती. यावेळी तो मलायका हिला तिच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसला होता.

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यामध्ये तिने लिहिले होते की, अखेर मी होकार दिलाच…मलायकाची ही पोस्ट पाहून अनेकांनी अंदाजा बांधला की, मलायका हिने अर्जुन कपूर याला लग्नास होकार दिला.

मलायका हिने यानंतर खुलासा केला की, तिने अखेर ओटीटीसाठी होकार दिला आहे. आता याच शोमुळे ती चर्चेत आलीये. नुकताच मलायकाच्या शोमधील एक प्रोमो व्हायरल झालाय. यामध्ये मलायका हिने मोठा खुलासा केला आहे.

मलायका हिने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोठे भाष्य केले आहे. कारण तिच्या आईच्या खानदानी बांगड्या या तिची बहीण अमृताजवळ असून मलायका म्हणते की, मी या भांगड्यांची खरी मालिक आहे.

कारण आपल्या दोघींपैकी मीच आता लग्न करणार असून या बांगड्यावर फक्त माझा अधिकार आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कारण यामध्ये मलायकाने दुसरे लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

सर्वांनाच माहिती आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती, मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या बाळाची आई होणार असून ती प्रेग्नेंट आहे. परंतू नंतर कळाले की, या फक्त अफवा आहेत.