Malaika Arora: “आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला डेट केलं की..”; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायका झाली व्यक्त

अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) 2016 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करतेय हे सर्वश्रुत आहे. या दोघांमधील वयाच्या अंतरावरून अनेकदा नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं.

Malaika Arora: आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला डेट केलं की..; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायका झाली व्यक्त
Malaika ArjunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 2:55 PM

अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) 2016 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करतेय हे सर्वश्रुत आहे. या दोघांमधील वयाच्या अंतरावरून अनेकदा नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. या ट्रोलिंगला न जुमानता मलायकानेही वेळोवेळी सडेतोड उत्तरं दिली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पुन्हा एकदा कमी वयाच्या मुलाला डेट करण्याबद्दल आणि घटस्फोटानंतर स्वतंत्र महिला म्हणून आयुष्य जगण्याबद्दल व्यक्त झाली. महिलेनं तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाला डेट केलं की जणू तिचं पावित्र्यभंग झाल्यासारखी वागणूक समाजाकडून देण्यात येते, असं ती या मुलाखतीत म्हणाली.

मलायका ही 48 वर्षांची असून अर्जुन हा 36 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून आता माध्यमांसमोरही ते याविषयी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. मात्र सुरुवातीला या दोघांनी हे नातं सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. अखेर 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. वयाने लहान असलेला पार्टनर मिळाला की पुरुषाला वेगळी आणि महिलेला वेगळी वागणूक दिली जाते, असं मलायका म्हणाली. आपला समाज हा स्त्रीद्वेष्टा असल्याचंही तिने म्हटलं.

इन्स्टा पोस्ट-

‘हॅलो’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर आपलं स्वतंत्र आयुष्य असणं एका महिलेसाठी खूप महत्त्वाचं असतं. मात्र महिलांच्या रिलेशनशिप्सबद्दल आपला समाज हा स्त्रीद्वेष्टा आहे. आपल्या वयापेक्षा लहान पुरुषाला डेट करणं म्हणजे महिलेचा पावित्र्यभंग झाला असंच इथे मानलं जातं. माझ्या आईने मला नेहमीच स्वतंत्रपणे आणि स्वत:च्या मर्जीने जगण्याचं शिकवलंय.”

अरबाज खानशी नातं संपल्यानंतर पुन्हा नव्याने रिलेशनशिपमध्ये येण्याबद्दल भीती वाटत असल्याची भावना मलायकाने एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. 2019 मध्ये दिलेल्या या मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा माझा संसार मोडला, तेव्हा मी पुन्हा कधी रिलेशनशिपमध्ये येईन असं वाटलं नव्हतं. माझा पुन्हा प्रेमभंग झाला तर कशी सावरू अशी चिंता मला होती. पण मलासुद्धा प्रेमाची, माझी काळजी घेणाऱ्या व्यक्तीची आणि एका नात्याची गरज होतीच. या नव्या नात्याने माझ्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण केला.”

मलायका आणि अरबाज 1998 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. जवळपास 18 वर्षांच्या संसारानंतर 2016 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना 19 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे.

हेही वाचा:

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक

Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.