वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही अत्यंत फिट दिसणारी, फॅशन सेन्सच्या बाबतीत तरुणाईलाही टक्कर देणारी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood) मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडिया नेहमीच चर्चेत असते. मलायकाचं खासगी आयुष्य सोशल मीडियावर जितकं चर्चेत असतं, तितकीच चर्चा तिच्या फॅशनेबल कपड्यांची होत असते. गेल्या महिन्यात तिने फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Shibani Wedding) यांच्या लग्नाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत मलायकाने तिच्या लूकने सर्वांनाच घायाळ केलं होतं. यावेळी मलायकाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर शिअर गाऊन परिधान केला होता. करीना कपूर, करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत पोझ देतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी कपड्यांवरून मलायकाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलर्सना मलायकाने आता उत्तर दिलं आहे.
जेनिफर लोपेझ किंवा रिहाना यांसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटींच्या अंगावर त्यांना असे कपडे आवडले असते. पण भारतीय सेलिब्रिटींनी तसे कपडे परिधान केले की त्यांना उगाच ट्रोल केलं जातं, असं मलायका म्हणाली. पिंकविलाला दिलेल्या या मुलाखतीत मलायका म्हणाली, “ते कपडे माझ्यावर खूप सुंदर दिसत होते. मी दुसऱ्यांचा विचार करत नाही. टीका करणारे, ट्रोल करणारे लोक दुतोंडी असतात असं मला वाटतं. रिहाना, जेनिफर किंवा बेयोन्से यांनी तसे कपडे परिधान केले असते, तर लोकांना ते आवडलं असतं. तीच गोष्ट तुम्ही इथे केली, तर लोकांच्या भुवया उंचावतात. ती काय करतेय, ती आई आहे, ती अशी आहे, ती तशी आहे, असे लोक सुनावतील. असं दुतोंडी का वागायचं? एखादी गोष्ट कौतुकास्पद असेल तर खुल्या मनाने त्याचं कौतुक करा. असा विरोधाभास का?”
“ट्रोलिंगचा परिणाम माझ्यावर होतो. जे लोक म्हणत असतील की त्यांच्यावर परिणाम होत नाही, तर ते मस्करी करत असतील किंवा खोटं बोलत असतील. पण अशा कमेंट्सचा त्रास होतो”, असंदेखील ती म्हणाली. फरहान-शिबानीच्या पार्टीला हजेरी लावलेल्या मलायकाच्या गर्ल्स-गँगची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.
हेही वाचा: