Malaika Arora Accident: अपघातात मलायकाच्या कपाळाला दुखापत; प्रकृतीविषयी बहीण अमृताने दिली माहिती
रविवारी झालेल्या अपघातानंतर अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपोलो रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मलायकाला आज (रविवारी) डिस्चार्ज देण्यात येईल. अपघातानंतर मलायकाचा सीटी स्कॅन काढण्यात आला असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं त्याच्या अहवालात स्पष्ट झालं.
शनिवारी झालेल्या अपघातानंतर अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपोलो रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मलायकाला आज (रविवारी) डिस्चार्ज देण्यात येईल. अपघातानंतर मलायकाचा सीटी स्कॅन काढण्यात आला असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं त्याच्या अहवालात स्पष्ट झालं. मलायकाची बहीण अमृता अरोरानेही (Amrita Arora) माध्यमांना तिच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. ‘मलायका बरी होतेय’, असं तिने सांगितलं. शनिवारी मुंबई-पुणे हायवेवर खोपोलीजवळ झालेल्या कार अपघातात मलायका किरकोळ जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका एका शूटवरून पुण्याहून मुंबईला परत येताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. या अपघातानंतर मलायकाला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Malaika Arora Accident)
‘मलायकाच्या कपाळाला किरकोळ जखम झाली आहे. सीटी स्कॅनच्या रिपोर्टमध्येही काही आढळले नाही आणि ती सध्या बरी आहे. मलायकाला आज डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर उद्या सकाळी तिला डिस्चार्ज देण्यात येईल’, अशी माहिती अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. अपघाताची चौकशी करून एफआयआर नोंदवला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 38 किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. अपघात प्रवण क्षेत्रात ही घडना घडली आहे. तीन वाहनं एकमेकांवर आदळली आणि यात तिन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर ड्राइव्हरने ताबडतोब तिथून पळ काढला. तर इतर अपघातग्रस्तांना किरकोळ जखमा झाल्या आहेत,” अशी माहिती खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली.
घटनास्थळाचे फोटो-
Actor Malaika Arora received minor injuries after her car met with an accident near Khalapur Toll Plaza in Mumbai, earlier today. She was hospitalized at Apollo hospital in Navi Mumbai. pic.twitter.com/OeTJGOk1EJ
— ANI (@ANI) April 2, 2022
मलाइकाच्या रेंज रोव्हरला दोन पर्यटकांच्या गाड्यांनी धडक दिली. “आम्हाला तिन्ही गाड्यांचे नोंदणी क्रमांक मिळाले आहेत आणि आता प्रत्यक्षात काय घडलं हे समजून घेण्यासाठी आम्ही मालकांशी संपर्क साधू. सध्या अपघाताविषयीचा तपास करून एफआयआर नोंदविला जाईल,” असं खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर म्हणाले.
हेही वाचा:
ठरलं! रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर; मुंबईत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ
‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला मोठा निर्णय