Malaika Arora: डीप नेक ट्रान्सपरंट गाऊनमध्ये मलायकाचा सुपरबोल्ड अंदाज; व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल

'मिस इंडिया 2022'च्या अंतिम फेरीला मलायकासोबत क्रिती सनॉन आणि नेहा धुपिया यांनीसुद्धा हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. मात्र या सगळ्यात मलायकानेच सर्वांचं लक्ष वेधलं.

Malaika Arora: डीप नेक ट्रान्सपरंट गाऊनमध्ये मलायकाचा सुपरबोल्ड अंदाज; व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल
Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 12:10 PM

मिस इंडिया 2022 (Miss India 2022) ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच पार पडली. रविवारी मुंबईत या सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. अंतिम फेरीसाठी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) परीक्षक होती. या कार्यक्रमाला मलायकाचा अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पहायला मिळाला. फॅशन आयकॉन म्हणून मलायका ओळखली जाते. वयाची चाळीशी ओल्यांडल्यानंतरही तिचं फिटनेस तरुणींनाही थक्क करणारं आहे. मात्र मलायकाला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मलायकाने शिअर लाँग गाऊन (shimmery gold gown) परिधान केला होता. मात्र हा गाऊन इतका ट्रान्सपरंट होता की अंतर्वस्त्रही दिसू लागल्याने नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं.

‘मिस इंडिया 2022’च्या अंतिम फेरीला मलायकासोबत क्रिती सनॉन आणि नेहा धुपिया यांनीसुद्धा हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. मात्र या सगळ्यात मलायकानेच सर्वांचं लक्ष वेधलं. डीप नेक गोल्डन शिअर गाऊन परिधान करत मलायकाने रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरील तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ 1-

पहा व्हिडीओ 2-

तुझा फॅशन सेन्स अत्यंत चुकीचा आहे, असं एकाने म्हटलं. तर केंडल जेनरला फॉलो करण्याचा प्रयत्न केलास, मात्र तू स्वस्तातली केंडल दिसतेय, असं दुसऱ्याने लिहिलं. चालताना मलायकाचा गाऊन उचलण्यासाठीही तिला इतरांची मदत घ्यावी लागली. त्यावरूनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत कर्नाटकाच्या सिनी शेट्टीने बाजी मारली. 21 वर्षीय सिनीने राजस्थानच्या रुबल शेखावत आणि उत्तरप्रदेशच्या शिनाटा चौहानला मात दिली. मिस इंडियानंतर आता मिस वर्ल्ड 2022 मध्ये सिनी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.