म्हणून मलायका अरोरा आणि अरबाजचा घटस्फोट, नेमकं कारण आलं समोर
मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला तरीही ते मुलांसाठी कायमच एकत्र येताना दिसतात. अरबाज खान आणि मलायका अरोराचे लव्ह मॅरेज झाले होते.
मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान कायमच चर्चेत असतात. मलायका आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवते. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अरबाज विमानतळावर (Airport) स्पॉट झाले होते. यावेळी दोघेही गप्पा मारत उभे होते. मलायका आणि अरबाज कायमच मुलगा अरहानला ड्रॉप करण्यासाठी विमातळावर येतात. जरीही मलायका आणि अरबाजचा घटस्फोट (Divorce) झाला तरीही ते मुलांसाठी कायमच एकत्र येताना दिसतात. अरबाज खान आणि मलायका अरोराचे लव्ह मॅरेज झाले होते.
मलायका अरोराचा या कारणामुळे तर झाला नाही ना घटस्फोट?
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे लग्न तब्बल 18 वर्षांनंतर तुटले. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला होता. 2017 मध्ये यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकाने अरबाज खानच्या वाईट सवयींबद्दल सांगितले होते, ज्या तिला अजिबात आवडत नाहीत. मलायका म्हणाली होती की, अरबाजला त्याच्या वस्तू कुठेही ठेवायची सवय आहे. तो एखादी वस्तू कधीच जागेवर ठेवत नाही.
अरबाज खान म्हणाला की, मलायका कधीच…
मलायका पुढे म्हणाली की जेंव्हा मग त्याला त्या वस्तूची गरज पडते, त्यावेळी सर्वत्र शोधले जाते. इतकेच नाही तर या मुलाखतीमध्ये अरबाज खान देखील सहभागी झाला होता. मलायकच्या वाईट सवयींविषयी बोलताना अरबाज खान म्हणाला की, मलायका कधीच तिची चूक मान्य करत नाही. ही तिची गोष्ट मला मुळीच आवडत नाही. आता मलायका आणि अरबाजला विभक्त होऊन बरेच वर्ष झाली आहेत. मलायकाने अर्जुन कपूरसोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केलीये.