Mallika Sherawat | मल्लिका शेरावत हिने सांगितले बाॅलिवूड इंडस्ट्रीमधील काळे सत्य
आता तर नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिका हिने बाॅलिवूडमधील एक काळे सत्य जगासमोर सांगून टाकले आहे.
मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मलायका तिच्या विधानांमुळे चर्चेत कायमच असते. आता तर नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिका हिने बाॅलिवूडमधील एक काळे सत्य जगासमोर सांगून टाकले आहे. मल्लिका हिने अत्यंत धक्कादायक विधान केले असून बाॅलिवूडमध्ये आपल्याला काम नेमके का मिळत नाहीये, याचेही कारण मल्लिका शेरावत हिने थेट सांगून टाकत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. मल्लिका हिने सांगितलेल्या गोष्टींमुळे मोठी खळबळजनक उडालीये.
बाॅलिवूडमधील काही चुकीच्या गोष्टींमुळे करिअरमध्ये मोठे नुकसान झाल्याचे देखील यावेळी मल्लिका शेरावत हिने सांगितले आहे. आता मल्लिका शेरावत हिने केलेल्या धक्कादायक खुलाश्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.
मल्लिका शेरावत म्हणाली की, मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. यामुळेच चित्रपटातील मुख्य अभिनेते माझ्यासोबत काम करण्यास नकार देतात. इतकेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या अभिनेत्याने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला.
चित्रपटातील अभिनेते माझ्यासोबत काम करण्यास नकार देतात, याचे सरळ सरळ कारण आहे ते म्हणजे मी कधीच त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्येच राहणाऱ्या अभिनेत्री या चित्रपटामध्ये लागतात.
कंट्रोलमध्ये राहणे याचा नेमका अर्थ काय होतो. हे देखील यावेळी मल्लिका शेरावत हिने सांगितले. मल्लिका म्हणाली की बस म्हटले की बसायचे, उठ म्हटले की उठायचे. इतकेच नाहीतर रात्री 3 वाजता अभिनेत्याने काॅल केला तर उचलावा लागतोच.
जर अभिनेत्याने तुम्हाला काॅल केला आणि रात्री त्याच्या घरी 3 वाजता बोलावले तरीही तुम्हाला जावेच लागते. जर तुम्ही असे नाही केले की, त्या अभिनेत्याला तुमच्यासोबत काम करायचे नसते.