VIDEO : मंदिरा बेदीचा आईसोबत वॉक; पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट!

अभिनेत्री मंदिरा बेदीसाठी गेले काही दिवस अतिशय कठीण होते. मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे 30 जून रोजी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर अभिनेत्री खूपच खचलेली दिसत होती.

VIDEO : मंदिरा बेदीचा आईसोबत वॉक; पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट!
मंदिरा बेदी
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 3:52 PM

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीसाठी गेले काही दिवस अतिशय कठीण होते. मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे 30 जून रोजी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर अभिनेत्री खूपच खचलेली दिसत होती. मंदिरा बेदीने स्वत: पतीचे अंत्य संस्कार केले. इतकेच नाही तर मंदिराने बाकीच्या लोकांसह पतीचा अर्थीही उंचावला होता. त्यावेळी मंदिरा या रडत देखील होत्या. (mandira bedi spotted with mother)

मंदिरा आता हळू हळू यामधून बाहेर येताना दिसत आहे. रविवारी आपल्या आईबरोबर फिरताना अभिनेत्री दिसली, त्यावेळी चालताना आईशीही बोलत होती. मंदिराकडे पहिलं तर असं वाटतं की, ती हळूहळू मुलांसाठी आणि कुटुंबासाठी स्वत: ला स्ट्रॉन्ग करत आहे. मंदिराला आता आई आणि वडील दोघांचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. मंदिराचे दोन्ही मुले लहान आहेत.

पतीसोबतचा फोटो शेअर

अशा परिस्थितीत मंदिरा बेदीने सोशल मीडियावर पती राज कौशलची अतिशय खास पद्धतीने आठवण शेअर केली होती. मंदिरा आणि राज यांचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहतेही भावनिक झाले होते. या फोटोमधून दोघांचेही एकमेकांवर किती प्रेम होते, हे समजते.

मंदिरानं उचलली पतीची अर्थी

राज यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना मंदिरानं अर्थी उचलली होती. प्रत्येकजण मंदिराच्या त्या निर्णयाचं कौतुक करत असताना काही लोक तिला सोशल मीडियावर ट्रोल करत होते. अशा वेळी मंदिराला जीन्स टॉप घालण्याची गरज नव्हती, अशीही काहींची प्रतिक्रिया होती.

कोण होते राज कौशल

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती.

मंदिरा बेदीसोबत विवाह

1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या : 

Drugs Case | ‘बिग बॉस’ फेम एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अटक

Net Worth | दुसऱ्यांदा पालक बनलेयत हरभजन सिंह-गीता बसरा, जाणून घ्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाबद्दल…

भूमिकेसाठी कायपण! अभिनेते अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू साकारण्यासाठी केसांना लावली कात्री!

(mandira bedi spotted with mother)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.