मुंबई : अधिवक्ता आशुतोष दुबे यांनी डिझायनर सब्यसाचीला (sabyasachi Mukherjee) मंगळसूत्राच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेल वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली आहे. खरं तर, नुकतेच सब्यसाचीने त्यांचे नवीन दागिने कलेक्शन लाँच केले. यामध्ये त्याने मंगळसूत्राचे काही फोटो शेअर केले आहेत. या मंगळसूत्रांमध्ये अतिशय बारीक कलाकुसरीचे काम करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये सब्यसाचीने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका प्लस साइज महिला मॉडेलने मंगळसूत्रासह अंतर्वस्त्र परिधान केले होते. या फोटोमध्ये मॉडेलसोबत एक पुरुष मॉडेलही होता, जो शर्टलेस दिसत होता.
ही जाहिरात पाहिल्यानंतर लोकांनी म्हटले की, सब्यसाची मंगळसूत्राची नाही तर कंडोमची जाहिरात करत आहे, असे वाटते आहे. अनेक संतप्त वापरकर्त्यांचा दावा आहे की, ही जाहिरात हिंदू संस्कृतीवर हल्ला आहे आणि यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, तुम्ही खरोखर कोणाची जाहिरात दाखवत आहात. आता हे दागिने कोणीही घालणार नाही, कारण तुम्ही जगाला दाखवून दिले आहे की, मी जर हे दागिने घातले तर मी एक अशीच स्त्री असेन. कृपया तुम्ही अशा जाहिराती करताना काळजी घ्या.
अंडरगारमेंट्समध्ये महिला मॉडेल्सना मंगळसूत्रांची जाहिरात करताना पाहून लोक संतापले होते. एकाने संताप व्यक्त करत लिहिले की, ‘यावर बहिष्कार टाका, आता हे पॉर्न ज्वेलरीचे केंद्र बनले आहे.’ सब्यसाची हा अशा डिझायनर्सपैकी एक आहे जो सतत नवीन प्रयोग करत राहतो, पण यावेळी तो त्याच्या नवीन कलेक्शनमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे.
Really sabyasachi??
What’s wrong with u these days,
Who sell Mangalsutra like this.
If u have guts sell burkha, tabij in this manners??
Stop Hindu discremation #Sabyasachi pic.twitter.com/KL2DiqDIAI— Kanan Shah (@KananShah_) October 27, 2021
This is shameful Act @sabya_mukherjee
You are selling the Mangal sutra by promoting nudity & obscene content with a hashtag #intimatefinejewellerybysabyasachi
This is intentional hurting of Hindu sentiments
Delete this post ASAP.
Link of insta post :- https://t.co/oQkhulxKmS pic.twitter.com/u0jlSoaFhT
— Yukti Rathi (@AdvYuktiRathi) October 27, 2021
Mangalsutra looks like this #Sabyasachi
It’s not a random piece of fashion jewellery, it indicates the love and commitment the husband and wife have towards each other. pic.twitter.com/HB3r4Aa4A4
— Sheetal Chopra ?? (@SheetalPronamo) October 27, 2021
याआधीही सब्यसाची ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. काही काळापूर्वी त्याने H&M च्या सहकार्याने एक कलेक्शन लॉन्च केले. त्याचे कलेक्शन काही मिनिटांतच विकले गेले, पण डिझायनरला मीम्ससह वेगवान फॅशनचा प्रचार केल्याबद्दल ट्रोल केले गेले. सब्यसाचीच्या उत्पादनावर अनेकदा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
Bigg Boss 15 | कतरिना कैफचा सलमान खानवर आरोप, अभिनेत्याने अशाप्रकारे केली चूक कबूल!