Manoj Bajpayee’s father | ‘फॅमिली मॅन’च्या वडिलांचे निधन, दीर्घ काळापासून होते आजारी, दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास
पद्मश्री विजेते मनोज बाजपेयी यांचे वडील आर के बाजपेयी यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही आठवड्यांपूर्वी राधाकांत बाजपेयी यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिग्दर्शक अविनाश दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.
मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या वडील आर. के. बाजपेयी यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही आठवड्यांपूर्वी राधाकांत बाजपेयी यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिग्दर्शक अविनाश दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.
वडिलांच्या निधनाचे वृत्त काळातच मनोज केरळहून दिल्लीला पोहोचला. केरळमध्ये तो आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. सप्टेंबर महिन्यातच मनोज बाजपेयींच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यावेळीसुद्धा अभिनेता मनोज बाजपेयी केरळमध्ये शूटिंग करत होता. वडिलांच्या तब्बेतीबद्दल माहिती मिळताच मनोज बाजपेयी यांनी शूटिंग थांबवले आणि तत्काळ घरी गेला.
वडिलांच्या खूप जवळ होते मनोज बाजपेयी
मनोज बाजपेयी सुरुवातीपासून आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहेत. यापूर्वी मनोज यांनी फारुख शेखच्या “जीना इसि का नाम” या शोमध्ये त्यांच्या वडिलांविषयीचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्यांच्या वडिलांनी त्याला कधीही कोणत्याही कामासाठी नकार दिला नाही. त्यांना नेहमी साथ दिली. या शोमध्ये मनोज बाजपेयी यांचे वडील राधाकांत बाजपेयी यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. या शो दरम्यान त्याच्या वडिलांनी म्हटले होते की, “माझ्या मुलाने माझे नाव अभिमानास्पद केले आहे.”
मनोज वाजपेयीचा “द फॅमिली मॅन 2” मध्ये दमदार अभिनय
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द फॅमिली मॅन 2” या वेब सीरिजमध्ये मनोज बाजपेयीचा अतिशय दमदार अभिनय पाहायला मिळाल. विशेष म्हणजे त्याची भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावलेला आहे. या मालिकेसाठी अभिनेत्याचे खूप कौतुकही झाले आहे. तर दुकरीकडे अभिनेता आजकाल कमल रशीद खानसोबत झालेल्या वादामुळेदेखील मनोज बाजपेयी चर्चेत आला होता. तसेच अभिनेता केआरकेविरोधात बदनामीचा खटला दाखल झाल्यानंतर देखील मनोज बाजपेयी खूप चर्चेत होता.
इतर बातम्या
शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…