‘…तेवढी लायकी नाही,’ नसीरूद्दीन शाह यांनी पुरस्कारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनोज बाजपेयीचं ट्विट व्हायरल!
नसीरूद्दीन शाह हे अभिनयासोबतच त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेही ते चर्चेत असतात. ते त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठीही ओळखले जातात. त्यांनी पुरस्कारांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. यावर मनोज बाजपेयी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नसीरूद्दीन शाह हे अभिनयासोबतच त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेही ते चर्चेत असतात. ते त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठीही ओळखले जातात. अलीकडेच नसीरूद्दीन शाह यांनी सांगितलं की ते पुरस्कारांचा वापर त्यांच्या फार्महाऊसमधील वॉशरूमच्या दरवाजाच्या हँडलप्रमाणे करतात.
नसीरूद्दीन शाह यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले की, फिल्मफेअर पुरस्कार हा स्वप्नासारखा आहे. हा पुरस्कार मिळणे म्हणजे अभिमानाची बाब आहे. मनोज बाजपेयी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी नसीरूद्दीन शाह यांच्यावर टीका केल्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. याबाबत मनोज यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांवर मनोज बाजपेयी यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. “नसीर भाईंशी मोठ्या आवाजात बोलण्याएवढी माझी ऐपत नाही. कुठूनही कसल्याही बातम्या पसरवता” , असं मनोज बाजपेयी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर सुभाष घई यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पुरस्कार कोणताही असो, तुमच्या कामाचे कोणी कौतुक करत असेल तर त्याचा आदर करायला हवा. तुम्हाला पुरस्कार मिळो किंवा न मिळो, तुम्हाला नामांकन मिळाले असेल तर तुम्ही चांगले काम केल्याची ती पावती असल्याचं घई म्हणाले.
दरम्यान, पुरस्कारांना जास्त महत्त्व देत नाही कारण त्यामध्ये पक्षापातीपण होत असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. अलीकडेच ताज: द रिव्हेंज या वेब सीरिजमध्ये ते दिसले आहेत. यामध्ये त्यांनी बादशाह अकबरची भूमिका साकारली आहे.