एमडीएचचं देशवासियांना मोठं गिफ्ट, ‘जय भारत’ हे देशभक्तीपर गीत देशाला अर्पण
"आसमान पे हम छाएंगे.,जो करना है कर जाएंगे, रोक सको तो रोक के देखो, हम ना रोके जाएंगे" या ओळी देशवासीयांमध्ये आत्मविश्वास आणि दृढ निश्चय निर्माण करतात. आपण एकजुटीने काम केलं तर आपण कोणतेही लक्ष्य प्राप्त करू शकतो, हेच या ओळीतून दिसून येतं.
“जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” या संस्कृत श्लोकाचा अर्थ माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत. गेल्या 105 वर्षांपासून एमडीएचने चवदार आणि निरोगी पदार्थ तयार करून देशसेवेला वाहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर एमडीएच ‘जय भारत’ हे देशभक्तीपूर्ण गाणं अर्पण करत आहे. प्रत्येक भारतीयाला भावुक करेल आणि भारताला विकसित आणि विश्वगुरु बनविण्यासाठी प्रेरित करेल, असं हे गाणं आहे.
पद्म भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय श्री धरमपाल गुलाटीजी यांचे चिरंजीव एमडीएचचे अध्यक्ष राजीव गुलाटी यांनी प्रसंगी या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या अथक प्रयत्नांनी आणि देशाबद्दलच्या अखंड प्रेमामुळे आपला देश यश आणि उंचीच्या पायऱ्यांवर पोहोचेल, असं सांगतानाच हाच जागतिक नेतृत्व करण्याचा एकमेव मार्ग आहे, असं राजीव गुलाटी यांनी सांगितलं.
View this post on Instagram
ह्या देशभक्तीपर गीतामध्ये एमडीएचच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडला गेला आहे आणि प्रसिद्ध गायक शान यांनी हे देशभक्तीपर गीत अतिशय सुंदरपणे गायले आहे. प्रत्येक क्षेत्रात अभिमान वाटेल असं काम करण्यास आपल्या पिढीला प्रेरित करेल असे हे राष्ट्रगीत आहे. हे राष्ट्रगीत आपल्या देशाच्या महान स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यासोबतच येणाऱ्या पिढींना आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी करण्याचा मार्गही दाखवेल.
“आसमान पे हम छाएंगे.,जो करना है कर जाएंगे, रोक सको तो रोक के देखो, हम ना रोके जाएंगे” या ओळी देशवासीयांमध्ये आत्मविश्वास आणि दृढ निश्चय निर्माण करतात. आपण एकजुटीने काम केलं तर आपण कोणतेही लक्ष्य प्राप्त करू शकतो, हेच या ओळीतून दिसून येतं. आणि “सोन की चिड़िया था अपना भारत हमको ज्ञात है,फिर ऐसे ही भारत का निर्माण करो तो बात है। देश बड़ा है हर मज़हब से युवा शक्ति का नारा है, विकसित भारत हो अपना अब ये संकल्प हमारा है” या ओळी भारताची महानता आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल सांगतात. एकत्र येऊन उन्नत आणि विकसित भारत करण्याचं लक्ष गाठण्यासाठी देशातील नागरिकांना प्रेरित करतात.
“अग्नि जैसा ताप हो जिसमे अग्निवीर बन जाता है,और वायु की गति से चलता तो तेजस कहलाता है” या ओळी आपल्या सैनिक आणि वैज्ञानिकांचा त्याग आणि बलिदान दर्शवतात. यांच्यामुळेच आपला देश बलवान आणि सुरक्षित आहे, हे त्यातून दिसून येतं.