Brahmastra | हैद्राबादमधील ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मेगा इव्हेंट रद्द, ज्युनियर एनटीआरने चाहत्यांची मागितली माफी
रामोजी फिल्म सिटीमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि जूनियर एनटीआरसोबत हा कार्यक्रम होणार होता. शेवटच्या क्षणी शो रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या रिपोर्टनुसार या इव्हेंटला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारली, यामुळे आयोजकांवर इव्हेंट रद्द करण्याची नामुष्की आली.
मुंबई : अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji) बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ अवघ्या काही दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार आहेत. स्टारकास्ट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतंय. चाहते देखील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, हैदराबादमध्ये ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाचा मेगा इव्हेंट रद्द करण्यात आलायं. विशेष म्हणजे हा सर्व इव्हेंट साऊथचा स्टार ज्युनियर एनटीआरसोबत होणार होता. अचानक हा इव्हेंट रद्द झाल्याने अनेक चर्चांना वाव मिळालीयं. इव्हेंटला अवघे काही तास शिल्लक असताना अचानकपणे इव्हेंट (Event) रद्द करण्यात आला.
मेगा इव्हेंट अचानक रद्द झाल्याने चाहत्यांमध्ये संताप
रामोजी फिल्म सिटीमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि ज्युनियर एनटीआरसोबत हा कार्यक्रम होणार होता. शेवटच्या क्षणी शो रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या रिपोर्टनुसार या इव्हेंटला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारली, यामुळे आयोजकांवर इव्हेंट रद्द करण्याची नामुष्की आली. मात्र, अचानक इव्हेंट रद्द करण्यात आल्याने चाहत्यांमध्येही मोठी निराशा झाल्याचे चित्र बघायला मिळाले असून पोलिसांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे परवानगी नाकारली, हे अजून कळू शकले नाहीयं.
ज्युनियर एनटीआरने मागितली चाहत्यांची माफी
आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी चाहते उत्सुक असताना अचानक इव्हेंट रद्द झाल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केलायं. सर्व चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या या प्री रिलीज प्रमोशनल इव्हेंटची माहिती स्वतः दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली. विशेष म्हणजे यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला होता. इव्हेंट रद्द झाल्यानंतर साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरने चाहत्यांची माफी मागितली आहे.