Laal Singh Chaddha: आमिरच्या समर्थनार्थ मिलिंद सोमणचं ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही आम्हाला आव्हान देत आहात का?’

एवढ्या प्रयत्नांनंतरही ट्विटरवरील 'लाल सिंग चड्ढा'चा बहिष्कार हा ट्रेंड थांबला नाही. अशा परिस्थितीत आता इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी आमिरच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. ज्यामध्ये पहिलं नाव आहे अभिनेता मिलिंद सोमणचं (Milind Soman).

Laal Singh Chaddha: आमिरच्या समर्थनार्थ मिलिंद सोमणचं ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, 'तुम्ही आम्हाला आव्हान देत आहात का?'
Laal Singh Chaddha: आमिरच्या समर्थनार्थ मिलिंद सोमणचं ट्विटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 10:11 AM

आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ‘लाल सिंह चड्ढा’ आणि आमिर खानचे निर्माते चिंतेत आहेत. आमिरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सर्वांना आपल्या चित्रपटावर बहिष्कार घालू नका अशी विनंती केली आणि लोकांसमोर स्वतःचा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही ट्विटरवरील ‘लाल सिंग चड्ढा’चा बहिष्कार हा ट्रेंड थांबला नाही. अशा परिस्थितीत आता इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी आमिरच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. ज्यामध्ये पहिलं नाव आहे अभिनेता मिलिंद सोमणचं (Milind Soman).

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने मंगळवारी पोस्ट शेअर करून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. मिलिंदने ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘आमिर खान’च्या समर्थनार्थ ट्विट करत लिहिलं, ‘ट्रोल्स चांगल्या चित्रपटाला रोखू शकत नाहीत.’ मिलिंद सोमणच्या ट्विटवर पुन्हा काही नेटकऱ्यांनी आमिर खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी आमिरच्या 2014 मधील ‘पीके’ या चित्रपटातील काही फोटो नेटकऱ्यांनी शेअर केले आणि चित्रपटात हिंदू देवतांचा कथित अपमान केल्याबद्दल आमिर खानला फटकारलं. तर काही युजर्सनी आमिरचं वादग्रस्त विधान पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आणि लोकांना चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. त्याचवेळी काही युजर्सनी मिलिंदला सवाल केला की, ‘तुम्ही आम्हाला आव्हान देत आहात का?’

आमिरची प्रतिक्रिया-

आमिर खाननेही सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ ट्रेंडवर आपलं मत व्यक्त केलं. आमिर म्हणाला, “जेव्हा लोक बॉलिवूड आणि लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. विशेषत: जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात, कारण त्यांना वाटतं की मी अशा लोकांच्या यादीत आहे ज्यांना भारत आवडत नाही. पण हे खरं नाही. काही लोक असा विचार करतात हे दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो थिएटरमध्ये जाऊन एकदा पहा.”

हे सुद्धा वाचा

काय म्हणाली करीना?

करीनाने नेटकऱ्यांना तिच्या चित्रपटाला विरोध न करण्याची विनंती केली आहे. ती पुढे म्हणाली, “कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो चित्रपट आधी थिएटरमध्ये जाऊन पहा. आजच्या काळात प्रत्येकाचं मत वेगळं असतं. आज प्रत्येकाला आपला आवाज आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे आता असं होणार असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकावं लागेल. अन्यथा तुमचं जगणं कठीण होईल आणि म्हणूनच मी अशी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही.”

मला जे पोस्ट करायचे आहे ते मी पोस्ट करते असंही करीना कपूर म्हणाली. “जर तो चांगला चित्रपट ठरला तर मला खात्री आहे की तो इतर कोणत्याही गोष्टीला (विरोधाला) मागे टाकेल आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल”, असा विश्वास तिने व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.