Milkha Singh Passes Away | ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह यांचे निधन, बॉलिवूड कलाकरांनी व्यक्त केला शोक

मिल्खा सिंह यांच्या जाण्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, रवीना टंडन, तापसी पन्नू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मिल्खा गेल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Milkha Singh Passes Away | ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह यांचे निधन, बॉलिवूड कलाकरांनी व्यक्त केला शोक
मिल्खा सिंह
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 11:23 AM

मुंबई : ‘फ्लाईंग शीख’ अर्थात लोकप्रिय धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांची कोरोनाशी झुंज अयशस्वी ठरली. अनेक दिवसांपासून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी (18 जून) निधन झाले आहे. 20 मे रोजी मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळले होते आणि शुक्रवारी 18 जून रोजी त्यांचे निधन झाले आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे 3 जून रोजी मिल्खा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते (Milkha Singh Passes Away Bollywood celebrities pay tribute to  legend on social media).

पत्नीच्या मृत्यूच्या अवघ्या 5 दिवसानंतर आता मिल्खा सिंह यांनीही या जगाचा निरोप घेतला आहे. स्वत: रूग्णालयात दाखल असल्यामुळे, मिल्खा यांना पत्नीचे अंत्य संस्कारदेखील करता आले नाहीत.

मिल्खा सिंह यांच्या जाण्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, रवीना टंडन, तापसी पन्नू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मिल्खा गेल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूडकरही झाले भावूक

‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात फरहानशिवाय सोनम कपूर देखील मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

या चित्रपटासाठी मिल्खा यांनी 1 रुपयांची नोट घेतली होती. ती नोट खूप खास होती कारण, ती 1958 मध्ये छापली गेली होती. खरं तर, त्याच वर्षी मिल्खा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

(Milkha Singh Passes Away Bollywood celebrities pay tribute to  legend on social media)

हेही वाचा :

‘आम्ही एका महान खेळाडूला गमावून बसलो’, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.