Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

भारताच्या हरनाज संधूनी (Harnaaz Sandhu) ‘मिस युनिव्हर्स’चा (Miss Universe 2021)  ताज पटकावला आहे. इस्रायलमध्ये 70वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा पार पडली. हरनाज या स्पर्धेतील प्रमुख स्पर्धक मानली जात होती. फर्स्ट रनर अप पॅराग्वा आणि सेकंड रनर अप दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवती ठरल्या.

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!
Harnaaz Sandhu
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 10:39 AM

मुंबई : भारताच्या हरनाज संधूनी (Harnaaz Sandhu) ‘मिस युनिव्हर्स’चा (Miss Universe 2021)  ताज पटकावला आहे. इस्रायलमध्ये 70वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा पार पडली. हरनाज या स्पर्धेतील प्रमुख स्पर्धक मानली जात होती. फर्स्ट रनर अप पॅराग्वा आणि सेकंड रनर अप दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवती ठरल्या. आजच्या दडपणाला सामोरे जाण्यासाठी तरुणींना काय सल्ला द्याल, असा प्रश्न स्पर्धकाला विचारण्यात आला.

यावर उत्तर हरनाज म्हणाले, ‘आजच्या तरुणाईवर सर्वात मोठं दडपण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. ही गोष्ट तुम्हाला अधिक चांगले होण्यास मदत करते. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.

कमी वजनामुळे हरनाजाही दडपणात!

अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, कमी वजनामुळे तिला खूप तणाव जाणवत होता. या तणावावर मात करण्यासाठी तिने सकारात्मक मानसिकता ठेवली. ती म्हणाले की, या कठीण काळात आपण अशा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा, ज्याला आपण आपल्या समस्या मोकळेपणाने सांगू शकतो आणि तो तुम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकतो.

टॉप 5 मध्ये तिला विचारण्यात आले होते की, ‘बर्‍याच लोकांना हवामान बदल ही अफवा वाटते? ही अफवा नाही हे तुम्ही लोकांना कसे समजावून सांगाल?’ यावर हरनाजने उत्तर दिले की, ‘निसर्ग किती समस्यांमधून जात आहे हे पाहून माझे हृदय पिळवटते आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे घडते आहे. मला वाटतं निसर्ग वाचवण्याची आणि त्याबद्दल काहीतरी कृती करण्याची हीच वेळ आहे. कारण निसर्ग वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि हेच मी आज तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.’

आईला श्रेय!

हरनाज तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला देते. 21 वर्षीय हरनाजला पोहणे, घोडेस्वारी, अभिनय आणि नृत्याची आवड आहे. हरनाजने दोन पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘मिस युनिव्हर्स 2021’ स्पर्धेत 75हून अधिक सौंदर्यवतींनी भाग घेतला. हरनाज संधूने या स्पर्धेतील ‘टॉप 3’मध्ये आपले स्थान निश्चित केले होते. मात्र, अंतिम फेरीत अभिनेत्रीने दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वेच्या स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. या कार्यक्रमात हरनाजला मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स 2021 अँड्रिया मेझा यांनी मुकुट घातला. कार्यक्रमाचे जागतिक स्तरावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

हेही वाचा :

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.