Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल; प्रकृतीबाबत मुलाने दिली माहिती

सोशल मीडियावरील (Social Media) विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांचा हा फोटो शेअर केला जात असून त्यांना नेमकं काय झालंय, असा सवाल चाहते विचारत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हाजरा यांनीसुद्धा मिथुन यांचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल; प्रकृतीबाबत मुलाने दिली माहिती
Mithun ChakrabortyImage Credit source: Colors
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 1:45 PM

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) होतोय. या फोटोवरून त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. रुग्णालयातील बेडवर झोपल्याचा त्यांचा हा फोटो असून त्यांच्या प्रकृतीविषयी चाहते चिंता व्यक्त करतायत. सोशल मीडियावरील (Social Media) विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांचा हा फोटो शेअर केला जात असून त्यांना नेमकं काय झालंय, असा सवाल चाहते विचारत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हाजरा यांनीसुद्धा मिथुन यांचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘लवकर बरे व्हा मिथुन दा’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. या व्हायरल फोटोवरून त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असल्याने अखेर मिथुन यांच्या मुलाने वडिलांच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीने सांगितलं की, वडिलांना किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र त्यांची तब्येत आता ठीक आहे. बेंगळुरूमधील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हाजरा यांचं ट्विट-

काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती हे कलर्स टीव्हीवरील ‘हुनरबाज’ या शोमध्ये झळकले होते. ते या शोचे परीक्षक होते आणि संपूर्ण सिझनमध्ये त्यांनी त्यांच्या खास अंदाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.