तब्बल एका दशकानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले बाॅलिवूड इंडस्ट्रीतील सत्य, फक्त माझ्या रंगामुळे मला अपमानित…
या शोच्या शेटवरील अनेक धमाकेदार व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे सध्या ‘सा रे ग म प’ शोमुळे चर्चेत आहेत. या शोच्या शेटवरील अनेक धमाकेदार व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात. मिथुन चक्रवर्ती आणि भारती सिंहचा एक काॅमेडी व्हिडीओ तर चाहत्यांना प्रचंड आवडला होता. ‘सा रे ग म प’च्या मंचावरून आता मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक अजिबात तयार केला जाणू नये, असे स्पष्ट सांगितलंय.
बॉलिवूडचे अभिनेते असो किंवा इतर क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यावर एक बायोपिक तयार व्हावा. मात्र, याला अभिनेते मिथुन चक्रवर्ती अपवाद आहेत, त्यांना अजिबात वाटत नाही की त्यांच्या आयुष्यावर आधारित कोणताही बायोपिक व्हावा. विशेष म्हणजे हे बोलतानाच याची काही कारणेही मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितली आहेत.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, मला वाटते की माझ्या आयुष्यात मी जे काही दिवस पाहिले आहेत, ते दुसऱ्या कोणीच बघू नयेत असे मला कायमच वाटते. प्रत्येकाने संघर्ष आणि वाईट दिवस पाहिले आहेत. परंतु माझ्या त्वचेच्या रंगामुळे मला नेहमीच अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या त्वचेमुळे अनेक वर्षे माझा अपमान झाला. मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा मला रिकाम्या पोटी झोपावे लागायचे आणि झोपण्यासाठी रडावे लागायचे.