Alia Bhatt: “त्यांना भीती होती की मी कदाचित लग्नच करणार नाही”; आलिया भट्टचा VIDEO चर्चेत
कन्यादान नव्हे कन्यामान, असं म्हणत 'मोहे' (Mohey) या ब्रायडल वेअरच्या ब्रँडची जाहिरात चांगलीच चर्चेत होती. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 'मोहे'ची ब्रँड अॅम्बेसेडर असून तिची नवी जाहिरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कन्यादान नव्हे कन्यामान, असं म्हणत ‘मोहे’ (Mohey) या ब्रायडल वेअरच्या ब्रँडची जाहिरात चांगलीच चर्चेत होती. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ‘मोहे’ची ब्रँड अॅम्बेसेडर असून तिची नवी जाहिरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या जाहिरातीसाठी आलियाने पुन्हा एकदा ब्रायडल गेटअप केला आहे. श्रेयांश वैद्य यांनी ‘दुल्हन वाली फिलिंग’ या अॅड कॅम्पेनअंतर्गत ही नवी जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. मुलगा असो वा मुलगी, समानतेविषयी भाष्य करणाऱ्या या जाहिरातीत आलिया एक नवा संदेश देताना दिसतेय. याआधी आलियाची एक जाहिरात चर्चेचा विषय ठरली होती. या जाहिरातीत उपस्थित केलेल्या कन्यादानाच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला होता. ‘मुलीला परकं धन का म्हटलं जातं? मुली दान करण्याची गोष्ट आहे का? कन्यादान का? त्याऐवजी नवीन कल्पना आत्मसात करुयात, कन्यामान’, असं आलिया या व्हिडीओत म्हणाली होती. (Alia Bhatt Ad)
जाहिरातीत आलिया काय म्हणतेय?
“मम्मी-पप्पांना भीती होती की कदाचित मी लग्नच करणार नाही आणि बळजबरी तर त्यांनी कोणत्याच बाबतीत केली नव्हती. जेव्हा जेव्हा लोक म्हणाले की मुलगी हाताबाहेर जाईल, तेव्हा माझं पूर्ण कुटुंब त्यांच्यावर धावून जायचं. त्यांना माहित होतं की त्यांची मुलगी इतरांपेक्षा वेगळी आहे पण चुकीची नाही. संस्कार तर सर्व आई-वडील आपल्या मुलांना देतात, पण त्यांनी मला आत्मविश्वास दिला, जशी आहे तशीच राहण्याचा. आता तोच आत्मविश्वास घेऊन मी नवीन घरात नवीन नाती जोडायला जातेय”, असं आलिया या जाहिरातीत म्हणताना दिसतेय.
View this post on Instagram
या जाहिरातीतून आलियाने स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही समान हक्क देणं, दोघांमधील आत्मविश्वास वाढवणं, कोणत्याही गोष्टीसाठी बळजबरी न करणं आणि सर्वांत महत्त्वाचं कुटुंबाने तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणं.. यांसारख्या गोष्टींवर या जाहिरातीतून प्रकाश टाकण्यात आला आहे.
हेही वाचा:
जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले