Money Laundering : नोरा फतेहीला दिलासा, जॅकलिन फर्नांडिस अजूनही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात!
200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. अभिनेत्री अजूनही ईडीच्या चौकशीत अडकली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनच्या भूमिकेची अद्याप चौकशी सुरू आहे.
मुंबई : 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. अभिनेत्री अजूनही ईडीच्या चौकशीत अडकली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनच्या भूमिकेची अद्याप चौकशी सुरू आहे. ईडी दुसरी फिर्यादी तक्रार दाखल करणार आहे. पहिले आरोपपत्र दाखल केल्यानंतर जॅकलिनची ईडीने दोनदा चौकशी केली होती.
मात्र, नोरा फतेहीला या प्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, तिच्याविरोधात कोणतीही लुक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही. ईडीच्या आरोपपत्रात नोराला प्रोसिक्युशन 45 असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, जॅकलिनसाठी त्रास सुरूच आहे. ईडीच्या आरोपपत्रात त्यांचा फिर्यादी साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
खरं तर हे प्रकरण ठक सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुकेशचे जॅकलिनसोबतचे कनेक्शन समोर आले आहे. सुकेश सांगतो की, त्याने अभिनेत्रीला अनेक आलिशान भेटवस्तू दिल्या आहेत. त्यानंतर सुकेश आणि जॅकलिनचे काही फोटोही सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यात दोघांमधील जवळचे नाते दिसून येत होते.
सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांपर्यंतच्या गिफ्ट्स दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या मांजराचा समावेश आहे.
नोरालाही दिल्या भेटवस्तू!
सुकेशने नोराला भेटवस्तूही दिल्याचे वृत्त समोर आले आहे. सुकेशने नोराला आयफोन आणि बीएमडब्ल्यू कार भेट दिली. आता ईडीचीही दोन्ही अभिनेत्रींवर नजर आहे. तसे, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने, जॅकलिनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा अभिनेत्रीच्या टीमकडून कोणतेही अपडेट आलेले नाही.
जॅकलिन आणि सुकेशवर सीरीज बनवण्याची योजना!
जॅकलिन आणि सुकेशची नावे सध्या खूप चर्चेत आहेत, त्यामुळे निर्माते या दोघांवर चित्रपट किंवा मालिका बनवण्याचा विचार करत आहेत. आता अलीकडील इंडिया टुडेच्या अहवालानुसार, एका OTT निर्मात्याने सुकेश आणि जॅकलिनच्या कथेत रस दाखवला आहे. दोघांमधील संबंध काल्पनिक असू शकतात, असे त्यांचे मत आहे. तसे, या दोघांवर एक कथा आणण्यासाठी उत्सुक असलेले निर्माते कोण आहेत हे अद्याप कळलेले नाही. या सीरीजचे नावही समोर आलेले नाही आणि या सीरीजमध्ये दोघांची भूमिका कोण साकारणार हेही अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा :
चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!