‘मुघल-ए-आझम’च्या निर्मितीवर खर्च झाला पाण्यासारखा पैसा, तिकिटासाठीही चार दिवस रांगेत उभे होते प्रेक्षक!

'मुघल-ए-आझम' चित्रपटाचे तिकीट फक्त तिकीट नव्हते, तर आठवणींचा पुष्पगुच्छ होता. त्यात चित्रपटाचे तिकीट, चित्रपटाची छायाचित्रे, चित्रपटाच्या गाण्यांची पुस्तिका आणि इतर अनेक संस्मरणीय गोष्टी असायच्या आणि किंमत, पूर्ण शंभर रुपये.

‘मुघल-ए-आझम’च्या निर्मितीवर खर्च झाला पाण्यासारखा पैसा, तिकिटासाठीही चार दिवस रांगेत उभे होते प्रेक्षक!
Mughal-E-Azam
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:44 AM

मुंबई : ज्या काळात एक डॉलर साडेपाच रुपयांना असायचा, त्या काळात सिनेमाची तिकिटे देखील दीड रुपयांची असायची. पण, ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचे तिकीट फक्त तिकीट नव्हते, तर आठवणींचा पुष्पगुच्छ होता. त्यात चित्रपटाचे तिकीट, चित्रपटाची छायाचित्रे, चित्रपटाच्या गाण्यांची पुस्तिका आणि इतर अनेक संस्मरणीय गोष्टी असायच्या आणि किंमत, पूर्ण शंभर रुपये. होय, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, 60च्या दशकात शंभर रुपयांचे सिनेमाचे तिकीट कोणी विकत घेतले असते! मात्र, ज्या दिवशी चित्रपटाचे आगाऊ बुकिंग उघडले गेले त्या दिवशी जवळच्या शहरांतील लोकही मुंबईत पोहोचले होते. ते चित्रपटाच्या तिकिटांसाठी मराठा मंदिरासमोर रांगेत उभे होते.

चित्रपटगृहांमध्ये ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईत एकच गोंधळ उडाला होता. देशातील एकशे पन्नास चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणे, हा त्या वेळी एक विक्रम होता. या चित्रपटासाठीच मराठा मंदिर पुन्हा रंगवण्यात आले. प्रीमियरमधील प्रिंट हत्तींवरून वाटण्यात आल्या. सिनेमाच्या बाहेर एक भव्य सेट उभारण्यात आला. चित्रपटाचे सर्व पोस्टर एकाच रंगात छापता यावेत म्हणून के आसिफने त्या काळातील एका प्रसिद्ध पेंट कंपनीचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला होता.

चार दिवस रांगेत उभे होते लोक!

मराठा मंदिरातील एका शोमध्ये, फक्त काही हजार लोकांसाठी आसन व्यवस्था होती आणि बाहेर तिकीट खरेदी करणारे सुमारे एक लाख लोक जमले होते. नाट्यगृहात जाणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले. पण लोक घरी परत गेले नाहीत. तिथेच उभे राहिले. एका दिवसात चार शोमध्ये चार हजार तिकिटे विकली गेली, दर आठवड्याला चार हजारांप्रमाणे 28 हजार आणि त्यानंतर पुढील एक महिना थिएटरमध्ये बुकिंग बंद राहिले. ‘मुघल-ए-आझम’ च्या रिलीजच्या वेळी भारतात लोक तीन ते चार दिवस तिकिटाच्या रांगेत होते.

तीन भाषांमध्ये एकाच वेळी झाले चित्रीकरण

‘मुघले आझम’ हा चित्रपट नसून, हिंदी सिनेमासाठीची एक कथा आहे. हिंदी आणि उर्दू व्यतिरिक्त, हा चित्रपट इंग्रजी आणि तमिळमध्येही शूट केला जाणार होता. प्रत्येक सीन तीन वेळा शूट करण्यात आला होता. पण या चित्रपटाची ‘अकबर’ नावाची चित्रपटाची तामिळ आवृत्ती फ्लॉप ठरली आणि के आसिफने नंतर त्या सर्व इंग्रजी कलाकारांना परत पाठवले, ज्यांना त्यांनी चित्रपट डब करण्यासाठी मुंबईला बोलावले होते. शापूरजी पालोनजी ग्रुपने के आसिफच्या चित्रपटावर निर्माता म्हणून खूप पैसे गुंतवले होते.

(Money like water was spent on the production of Mughal-e-Azam the audience stood in line for four days even for tickets)

हेही वाचा :

पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही, रितेश देशमुखने खरं नाव सांगितलं!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.