Monica O My Darling | क्राईम थ्रिलर ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चे ट्रेलर रिलीज…
ट्रेलर पाहून चित्रपट सस्पेन्सने भरलेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे हे ट्रेलर ही प्रेक्षकांना चांगलेच आवडले आहे.
मुंबई : बहुचर्चित चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चे नुकताच ट्रेलर रिलीज झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचे हे ट्रेलर ही प्रेक्षकांना चांगलेच आवडले आहे. मोनिका ओ माय डार्लिंगमध्ये मुख्य भूमिकेत हुमा कुरेशी, राजकुमार राव आणि राधिका आपटे आहेत. ही जोडी आता धमाका करण्यास तयार आहे. ट्रेलर पाहून चित्रपट सस्पेन्सने भरलेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
मोनिका ओ माय डार्लिंग हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर आहे, ज्यामध्ये जबरदस्त कॉमेडी आणि ड्रामाही पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला हुमा कुरेशी लाल रंगाच्या गाऊनमध्ये एकदम बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. विशेष यादरम्यान पिया तू अब तो आजा हे गाणे देखील सुरू आहे. राजकुमार राव काच साफ करताना दिसत आहे.
या चित्रपटात अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर देखील दिसत आहे. सिकंदर देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. राधिका आपटे एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा सर्व चित्रपट एका तरूण मुलावर आधारित आहे. या मुलाला एका रात्रीत करोडपती व्हायचे असते, यासाठी तो काय करतो हे सर्व दाखवण्यात आले आहे.
चित्रपटाचे रिलीज झालेले ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडले असून राधिक आपटेच्या लूकचे तर काैतुक केले जात आहे. राधिका कशाप्रकारे या खुनाचा उलगडा करते हे ट्रेलरमध्ये दिसत आहे. भगवती पेरुमल, आकांक्षा रंजन कपूर, सुकांता गोयल हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.