Breakup Story | आधीच विवाहित तरीही वहीदा रेहमानच्या प्रेमात आकंठ बुडाले होते गुरुदत्त, वाचा अधुऱ्या प्रेमाची ‘अधुरी दास्ताँ’

हिंदी सिनेमाचे दिग्गज गुरू दत्त (Guru Dutt) यांचे खरे नाव ‘वसंतकुमार शिवशंकर पदुकोण’ होते. दिग्दर्शक, निर्माते, नृत्यदिग्दर्शक आणि अभिनेता बनून गुरु दत्त यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच नाव कमावले होते. पण त्यांचे वास्तविक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते.

Breakup Story | आधीच विवाहित तरीही वहीदा रेहमानच्या प्रेमात आकंठ बुडाले होते गुरुदत्त, वाचा अधुऱ्या प्रेमाची ‘अधुरी दास्ताँ’
गुरु दत्त-वहीदा रेहमान
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 9:42 AM

मुंबई : हिंदी सिनेमाचे दिग्गज गुरू दत्त (Guru Dutt) यांचे खरे नाव ‘वसंतकुमार शिवशंकर पदुकोण’ होते. दिग्दर्शक, निर्माते, नृत्यदिग्दर्शक आणि अभिनेता बनून गुरु दत्त यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच नाव कमावले होते. पण त्यांचे वास्तविक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते (Most Saddest break story of Bollywood famous couple Guru Dutt and Waheeda Rehman).

गीता दत्तशी लग्नानंतर गुरु दत्त यांचे हृदय अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांच्यावर आले होते. पण वहीदा आणि गुरु दत्त यांच्या प्रेमाला कधीच नात्याचे रूप मिळू शकले नाही.

कसे पडले वहीदांच्या प्रेमात?

गुरु दत्त त्यांच्या ‘सीआयडी’ या चित्रपटासाठी एक नवीन चेहरा शोधत होते. त्या काळात वहीदा दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होत्या. दरम्यान, एका कार्यक्रमात प्रथमच गुरु दत्त यांची नजर सुंदर वहीदावर पडली. त्यांनी अभिनेत्रीला ‘सीआयडी’च्या स्क्रीन टेस्टसाठी बोलावले. नशिबने साथ दिली आणि त्यांची या चित्रपटासाठी निवड झाली. असं म्हणतात की, या चित्रपटाच्या दरम्यानच या दोघांमध्ये जवळीकही वाढू लागली होती.

एकत्र केले काम

असे म्हटले जाते की, वहीदाच्या प्रेमात बुडालेले गुरु दत्त प्यासा या चित्रपटात आधी दिलीप कुमार यांना घेणार होते. पण नंतर त्यांनी स्वत:च या चित्रपटात वहीदा यांच्यासोबत काम करण्याचे ठरवले. या चित्रपटात दोघांची जोडी खूप पसंत केली जात असतानाच, त्यांच्या प्रेमाच्या कहाण्याही ऐकायला येऊ लागल्या. असे म्हणतात की, गुरु दत्तच्या चित्रपटांमध्ये वहीदा रहमानचे विशेष सीन लिहिले गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार गुरु दत्त स्वत: वहीदासाठी खास सीन लिहायचे.

वहीदावर नाराज झाले होते गुरु दत्त

एक काळ असा होता की, वहीदा रेहमानवर चिडलेल्या गुरु दत्तने त्यांच्या प्रवेशावर बंदी देखील घातली होती. बर्‍याच मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, एकदा वहीदा यांना मेक-अप रूममध्ये जाण्यापासून रोखले गेले होते आणि त्यांना त्याचे कारणही सांगितले गेले नव्हते. यामागील कारण म्हणजे गुरू दत्तशी झालेले त्यांचे भांडण असे म्हटले जाते. कारण, त्या वेळी गुरू दत्त वहीदाला स्वतःच्या अटीनुसार वागवू पाहत होते. गुरु दत्त यांचे मित्र अबरार अल्वी यांनी आपल्या ‘टेन इयर्स विथ गुरु दत्त’ या पुस्तकात गुरू दत्त यांनी वहीदा यांच्या प्रवेशावर बंदी घातल्याचा उल्लेख केला आहे.

या घटनेने वहीदा खूप दुःखी झाल्या होत्या. असं म्हणतात की, या घटनेनंतर गुरु दत्तने वहीदा रहमानला नकार दिल्याचे वृत्त चर्चेत येऊ लागले. दोघांमधील वादविवादाची चर्चा बरीच ऐरणीवर आली होती.

दोघांची मेकअप रूम शेजार-शेजारीच!

गुरू दत्त यांना वहीदा रेहमान यांनी आपल्या आजूबाजूलाच राहावे, अशी इच्छा होती, म्हणूनच ‘गुरु दत्त फिल्म्स’च्या सेट्सवर वहीदा यांची मेकअप रूम गुरु यांच्या मेकअप रूमच्या अगदी जवळ होती. वहीदा त्यावेळी गुरूच्या इतक्या जवळ होत्या की, त्या इतर कोणत्याही बॅनरखाली एखाद्या चित्रपटात काम करत असल्या तरीही ‘गुरुदत्त फिल्म्स’ ची मेकअप रूम वापरत असत.

गुरूने केली गीताची निवड

गुरु दत्त आणि वहीदा रेहमान यांच्या लग्नाची बातमी जेव्हा चर्चेत आली, तेव्हा गुरु दत्त यांच्या पत्नी गीता मनापासून दु:खी झाल्या. असं म्हणतात की, पतीवर नाराज झालेल्या गीता यांनी स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत गुरूला पत्नी किंवा मैत्रीण निवडायची होती, म्हणून त्यांनी त्यावेळी पत्नीची निवड केली होती. जेव्हा गीता घरी परत आल्या, तेव्हा त्यांनी पतीवर दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर गुरु दत्त यांनी वहीदापासून दूर जाण्यास सुरुवात केली.

आपल्या पत्नीच्या दबावामुळे अभिनेत्याने स्वत:ला वहीदापासून दूर केले, परंतु ते आतून खचले होते. यावर विमल मित्र यांना त्यांच्या ‘बिछडे सब बारी बारी’ या पुस्तकात सांगितले होते की, वहीदा आयुष्यातून दूर झाल्यापासून त्यांची झोप देखील उडाली होती, त्यानंतर अशी वेळ आली की गुरु दत्त मृत्यूला शरण गेले. तर, 1974मध्ये वहीदा यांनी आपला जीवनसाथी निवडला होता.

(Most Saddest break story of Bollywood famous couple Guru Dutt and Waheeda Rehman)

हेही वाचा :

Breakup Story | एकमेकांवर जीवापाड प्रेम, तरीही लग्नाच्या 2 वर्षांतच तुटलं करण-जेनिफर विंगेटचं नातं!

Video | ‘ते निघून गेले पण त्यांच्या आठवणी राहतील…’, दिलीप कुमारांच्या आठवणीने भावूक झाले धर्मेंद्र

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.