Satyameva Jayate 2 : जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, लवकरच चित्रपट होणार रिलीज!
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सत्यमेव जयते 2' (Satyamev Jayate 2) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ (Satyamev Jayate 2) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आधी हा चित्रपट 26 नोव्हेंबरला रिलीज होणार होता, आता त्याची रिलीज डेट बदलून 25 नोव्हेंबर करण्यात आली आहे. होय, जॉन अब्राहमचे चाहते एक दिवस आधी चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. स्वतः जॉन अब्राहमने त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.
एवढेच नाही, तर या घोषणेसह जॉन अब्राहमने त्याच्या चित्रपटाचा पहिला ट्रेलर कधी रिलीज होत आहे, हे देखील सांगितले आहे. जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो शर्टलेस आणि दोन लोकांना हातात घेऊन जाताना दिसत आहे. जॉनने पोलिसांचा गणवेश घातला आहे. त्यांच्या मागे लोकांचा जमाव दिसतो आणि त्यांच्या मागे अशोक चिन्हही दिसते आहे.
पाहा पोस्टर :
View this post on Instagram
‘या’ दिवशी चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज होणार!
या मोशन पोस्टरमध्ये, जॉन अब्राहम त्याच्या परिपूर्ण तंदुरुस्त शरीराला फ्लाँट करताना दिसला. हे मोशन पोस्टर शेअर करताना जॉन अब्राहमने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सत्यमेव जयते 2’, 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. पुन्हा एकदा सिनेमांमध्ये अॅक्शन आणि मनोरंजन पाहायला मिळणार आहे. ‘सत्यमेव जयते 2’चा ट्रेलर 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
एकीकडे, आता जॉन अब्राहमचे चाहते त्याच्या चित्रपटाबद्दल आनंदी आहेत. त्याच वेळी, ते सुरुवातीला थोडा निराशही झाले होते. कारण यापूर्वी असे वृत्त आले होते की ‘सत्यमेव जयते 2’ सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाशी टक्कर देऊ शकतो. यापूर्वी हे दोन्ही चित्रपट ईदला म्हणजेच 13 मे रोजी रिलीज होणार असल्याचे कळले होते. तथापि, चित्रपट निर्मात्यांनी ‘सत्यमेव जयते 2’ चे रिलीज पुढे ढकलले आणि 26 नोव्हेंबरला आणि ‘राधे’ त्याच्या वेळापत्रकानुसार रिलीज केले.
‘सत्यमेव जयते 2′ ची कथा अन्याय आणि सत्तेच्या गैरवापराभोवती विणलेली आहे. जॉन अब्राहम व्यतिरिक्त, दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई, साहिल वैधी आणि अनूप सोनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्याची कथाही मिलाप झवेरीने लिहिली आहे. टी-सीरीज आणि एमी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा :
औरंगाबाद शहरातील सिनेमागृहे आज उघडणार, ‘चेहरे’ अन् ‘बेल बॉटम’ प्रेक्षकांच्या भेटीला