Major | ‘देशाला सांभाळणं सैनिकाची जबाबदारी आहे!’, पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कथा सांगणारा ‘मेजर’चा जबरदस्त टीझर!

टीम मेजरने वेगवेगळ्या ठिकाणी, सेट्स आणि दिवसांमध्ये झालेल्या शूटिंगच्या प्रक्रियेचे वर्णन करणाऱ्या एका मनोरंजक व्हिडीओसह चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. युद्ध-नाटकावर आधारित हा चित्रपट आता 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Major | ‘देशाला सांभाळणं सैनिकाची जबाबदारी आहे!’, पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कथा सांगणारा ‘मेजर’चा जबरदस्त टीझर!
Major
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 3:58 PM

मुंबई : टीम मेजरने वेगवेगळ्या ठिकाणी, सेट्स आणि दिवसांमध्ये झालेल्या शूटिंगच्या प्रक्रियेचे वर्णन करणाऱ्या एका मनोरंजक व्हिडीओसह चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. युद्ध-नाटकावर आधारित हा चित्रपट आता 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टीम ‘मेजर’ने मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या प्रवासाचा मागोवा घेते, त्यांचे शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची कहाणी पडद्यावर आणली आहे. या चित्रपटात ज्यांनी आपल्या आयुष्यात निःस्वार्थपणे भारताच्या नागरिकांची सेवा केली अशा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका अभिनेता आदिवी शेष यांनी साकारली आहे. 26/11च्या मुंबई हल्लाच्या दुःखद घटनांमध्ये ते शहीद झाले होते.

पाहा टीझर :

निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडीओमध्ये, टीम मेजरने 8 सेट्स, 75 लोकेशन्सवर शूटिंगच्या दीर्घ आणि कठीण प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे, 3 भाषांमध्ये रिलीज होणारा मेजर 120 दिवसांत शूट झाला आहे. तत्पूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझरचे अनावरण केले, ज्यामध्ये संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून, किशोरावस्थेपासून ते सैन्यातील गौरवशाली वर्षांपर्यंतच्या जीवनातील विविध टप्पे दाखवले आहेत.

मोठ्या थाटात, भावनांच्या लाटेसह, जबरदस्त टीझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची अपेक्षा निर्माण केली आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित, आदिवी शेषा, शोभिता धुलिपाला आणि सई मांजरेकर अभिनीत बहुभाषिक चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. Sony Pictures Films India द्वारे महेश बाबूच्या GMB Entertainment आणि A+S Movies यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, मेजर पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

चित्रपटाबद्दल बोलताना आदवी म्हणाला…

चित्रपटाबद्दल बोलताना आदिवीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता यांनी मला तो बनवण्यात मदत केली आहे. लोकांना असे वाटते की आम्ही हा चित्रपट 26/11 च्या हल्ल्यावरच बनवला आहे. पण ते तसे नाही. या चित्रपटात संदीप सरांच्या आयुष्याबद्दल अधिक माहिती दाखवण्यात आली आहे. तुम्हा सर्वांना हा चित्रपट आवडेल अशी आशा आहे.

संदीपच्या कुटुंबीयांचे आभार

आदिवी पुढे म्हणाले की, ‘संदीपच्या कुटुंबीयांचे मी खूप आभारी आहे ज्यांनी हा चित्रपट बनवण्यास परवानगी दिली. हा संपूर्ण चित्रपट मी त्यांना समर्पित करतो. याआधी, कोरोनाच्या काळात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात असताना, पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू होईपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे आदिवी यांनी सांगितले होते.

हेही वाचा :

Lookalike : चाहत्यांना सापडली आलिया भट्टची ड्युप्लिकेट, फोटो पाहून ओळखणं होईल कठीण

Happy Birthday Saumya Tandon | ‘गोरी मेम’ बनून सौम्य टंडनने गाजवला टीव्हीचा पडदा, आरोग्याची कारणं देत सोडली मालिका!

Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.