Mukesh Birth Anniversary : ‘क्या खूब लगती हो’पासून ते ‘मैं पल दो पल का शायर हूं’पर्यंत, ऐका मुकेश यांची सदाबहार गाणी!

आज दिग्गज भारतीय पार्श्वगायक मुकेश चंद्र माथुर (Mukesh) यांची जयंती आहे. मुकेश बॉलिवूडचे खूप लोकप्रिय गायक होते. त्यांनी मनोरंजन विश्वाला बरीच उत्तमोत्तम गाणी दिली आहेत. त्यांची सगळी गाणी आजही रसिकांच्या जिभेवर रेंगाळतात.

Mukesh Birth Anniversary : ‘क्या खूब लगती हो’पासून ते ‘मैं पल दो पल का शायर हूं’पर्यंत, ऐका मुकेश यांची सदाबहार गाणी!
मुकेश
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 12:20 PM

मुंबई : आज दिग्गज भारतीय पार्श्वगायक मुकेश चंद्र माथुर (Mukesh) यांची जयंती आहे. मुकेश बॉलिवूडचे खूप लोकप्रिय गायक होते. त्यांनी मनोरंजन विश्वाला बरीच उत्तमोत्तम गाणी दिली आहेत. त्यांची सगळी गाणी आजही रसिकांच्या जिभेवर रेंगाळतात.

मुकेश यांना ‘कई बार यूं भी देखा है’ गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. राज कपूर, मनोज कुमार, फिरोज खान, सुनील दत्त आणि दिलीप कुमार अशा दिग्गज कलाकारांचा ते आवाज बनले. या सर्व कलाकारांच्या चित्रपटातील बहुतेक गाणी मुकेश यांनी गायली होती. ती गाणी इतकी सुपरहिट ठरली की, त्या गाण्यांची जागा नंतर कोणतेच गाणे घेऊ शकले नाही. आज, मुकेश यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांची काही सर्वोत्तम गाणी पाहणार आहोत.

क्या खूब लगती हो

फिरोज खान आणि हेमा मालिनीवर चित्रित झालेले हे गाणे खूप गाजले. मुकेश यांचा जादूई आवाज आणि दोन्ही कलाकारांची जबरदस्त केमिस्ट्रीने या गाण्याला चार चांद लावले. मुकेशबरोबर या गाण्यात कुमारी कंचन यांनी आपला आवाज दिला आहे.

चांद सी महबूबा हो मेरी

मनोज कुमार आणि माला सिन्हावर चित्रित केलेले हे गाणे खूपच गोड आहे. यामध्ये, प्रियकर ज्या प्रकारे आपल्या प्रेयसीची प्रशंसा करतो, ते खूप रोमँटिक आहे. आजही अनेक जोडपी हे गाणे एकमेकांना समर्पित करतात. मुकेशचे हे गाणेही सुपरहिट ठरले होते.

कभी-कभी मेरे दिल में ख्याल आता है

शशी कपूर आणि राखी यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे खूप रोमँटिक आहे. चाहत्यांना हे गाणे खूप आवडले. हे गाणे मुकेश यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत गायले होते. शशी कपूर आणि राखीखेरीज या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि वहीदा रहमान मुख्य भूमिकेत दिसले होते.

जीना यहां मरना यहां

आजही राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील हे गाणे ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात. हे गाणे मनाला स्पर्शून जाते. मुकेश यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत शंकर जयकिशन यांनी दिले असून गीत शैलेंद्र यांनी लिहिले आहे.

मैं पल दो पल का शायर हूं

अमिताभ बच्चन, राखी आणि शशी कपूर यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाच्या ‘मैं पल दो पल का शायर हूं’ या गाण्याने हृदयाला शांतता मिळते. मुकेशच्या जादुई आवाजाने हे गाणे सुपरहिट बनले. गाण्याला संगीत खय्याम यांनी दिले असून, गीत साहिर लुधियानवी यांनी दिले आहेत.

(Mukesh Birth Anniversary From ‘Kya Khoob Lagti Ho’ to ‘Main Pal Do Pal Ka Shayar Hoon’, listen to Mukesh’s evergreen songs)

हेही वाचा :

Raj Kundra Case | गुन्हे शाखेची राज कुंद्रावर कडक कारवाई, वेगवेगळ्या खात्यातील 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम फ्रीज!

Shamita Shetty : शमिता शेट्टीही शिल्पा इतकीच नितांत सुंदर, बॉलिवूडमध्ये फ्लॉप, पण लाईफस्टाईल अलिशान…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.