Shaktimaan : शक्ति.. शक्ति… शक्तिमान मोठ्या पडद्यावर अवतरणार, फॅन्सचा आनंद गगनात मावेना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

आपला लाडका शक्तिमान मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही अन् मग सुरु झाला मिम्सचा पाऊस... काहींनी तर या शक्तिमानची तुलना अल्लू अर्जूनच्या सुपरहीट पुष्पाशी केली.

Shaktimaan : शक्ति.. शक्ति... शक्तिमान मोठ्या पडद्यावर अवतरणार, फॅन्सचा आनंद गगनात मावेना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!
शक्तिमान
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 4:06 PM

आयेशा सय्यद, मुंबई : शक्तिमान (Shaktimaan) हा कार्यक्रम पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल. शक्तिमान हा एकेकाळी लहान मुलांचा सुपरहिरो… हाच सुपर हिरो आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी याची घोषणा केली आहे. देशातील पहिला टीव्ही सुपरहिरो ‘शक्तिमान’ लवकरच पुनरागमन करणार आहे. या सुपर हिरोची क्रेझ इतकी आहे की या चित्रपटाची घोषणा होताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग काय सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ… सगळीकडे फक्त एक चर्चा शक्तिमान आणि शक्तिमान… आता आपला लाडका शक्तिमान मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही अन् मग सुरु झाला मिम्सचा पाऊस… काहींनी तर या शक्तिमानची तुलना अल्लू अर्जूनच्या सुपरहीट पुष्पाशी केली. शक्तिमानला थेट पुष्पाचा डायलॉग म्हणायला लावला.

शक्तिमानच्या फॅन्सची कल्पकता

आपला सुपहिरो मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर त्याचे फॅन्समध्येही उत्साह संचारलाय. यावर अनेक हटके मीम्स बनलेत.

एकाने लिहिलंय, “शक्तिमान पडद्यावर आल्यावर मजा येणार…”

दुसऱ्याने लिहिलंय, “शक्तिमान मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर माझी रिअॅक्शन…”

तर तिसऱ्याने तर शक्तिमानला थेट पुष्पा स्टाईममध्ये उभं केलंय आणि लिहिलंय “मैं वापस आ गया साला…”

शक्तिमान मोठ्या पडद्यावर अवतरणार

अनेकांचं बालपण शक्तिमानला बघूनच गेलंय. त्यामुळे शक्तिमानचा चाहता वर्ग मोठा आहे. हा शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. शक्तिमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी याबाबतची माहिती त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. त्यामुळे शक्तिमानच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे. शक्तिमानचा पोस्टर आणि टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. सगळीकडे फक्त शक्तिमानचीच हवा आहे.

सोनी पिक्चर्स इंडियाने या सिनेमाची घोषणा केली आहे. एकेकाळी टीव्ही जगतावर राज्य करणारा शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर यायला सज्ज झालाय त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो पहावं लागेल.

संबंधित बातम्या

IPL 2022 Auction Day 1 Live Updates: मेगा ऑक्शनमध्ये दिसला शाहरूखचा मुलगा, चाहता म्हणाला, ‘शेर का बच्चा आ गया’

बदलली, बदलली, अरुंधती अख्खी बदलली, आशुतोष केळकर डोळे मोठे करुन पाहातच राहिला? तुम्ही पाहिलंत?

Pondicherry Movie : २५ फेब्रुवारीपासून घडणार ‘पाँडीचेरी’ची सैर, मोबाईलवर शूट झालेला पहिला मराठी सिनेमा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.