Annu Kapoor | अन्नू कपूर यांना लाखोंचा चुना लावणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या व्यक्तीने अन्नू कपूर यांच्याकडून सर्व माहिती घेत थेट ओटीपी देखील घेतला होता.
मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक झाल्याची बातमी पुढे आली होती. एका व्यक्तीने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे आता त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. KYC च्या नावाखाली या व्यक्तीने अन्नू कपूर यांच्याकडून सर्व माहिती घेत थेट ओटीपी देखील घेतला होता. यावेळी अन्नू कपूरची 4.36 लाखांची फसवणूक झाली.
अन्नू कपूरची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष पासवान असे असून त्याला मुंबईतील अंधेरी भागातून पोलिसांनी अटक केलीये. हा व्यक्ती मुळचा बिहारचा असल्याचे देखील सांगितले जात आहे.
पोलिसांनी या व्यक्तीकडून काही मोबाईल आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत. अन्नू कपूर यांनी तक्रार करताच पोलिसांनी कारवाई करत त्याचवेळी बँकेची 3 लाखांची रक्कम वापस मिळवली होती.
बँकेचा KYC अपडेट नसल्याचे त्या व्यक्तीने अन्नू कपूर यांना सांगितले होते. यावेळी अन्नू कपूर यांना वाटले की, ती व्यक्ती खरोखरच बँकेमधून बोलत आहे. अन्नू कपूर यांना या व्यक्तीने बोलण्यामध्ये इतके जास्त व्यस्त केले की, त्याने ओटीपी मागितला आणि अन्नू कपूर यांनी शेअरही केला होता.