Kartik Aaryan | मुंबई पोलिसांनी कार्तिक आर्यन याच्या विरोधात फाडले चलन, सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आला आणि…

कार्तिक आर्यन हा शहजादा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. शहजादा चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन हा चर्चेत होता. शेवटी आज 17 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज झालाय.

Kartik Aaryan | मुंबई पोलिसांनी कार्तिक आर्यन याच्या विरोधात फाडले चलन, सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आला आणि...
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 8:56 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा निर्मात्यांना आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त झाल्याचे सांगितले जातंय. मात्र, शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाचा फटका शहजादा चित्रपटाला बसण्याची दाट शक्यता आहे. कार्तिक आर्यन हा शहजादा (Shehzada) या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. शहजादा चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन हा चर्चेत होता. शेवटी आज 17 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज झालाय. अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शहजादा या चित्रपटाचे काैतुक केले. इतकेच नाही तर शहजादा चित्रपट हा फुल पैसा वसुल असल्याचे देखील अर्जुन कपूर याने म्हटले आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. मात्र, 25 जानेवारी रोजी रिलीज झालेला शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट अजूनही बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत थेट चित्रपटाच्या तिकिटाचे दर कमी केले आहेत. यामुळे याचा फटका शहजादाला बसू शकतो.

शहजादा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यन हा थेट मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहचला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी भगवा रूमाल कार्तिक आर्यनच्या गळ्यात दिसत आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कार्तिक आर्यन याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी चलन फाडल्याची माहिती मिळत आहे. कार्तिक आर्यन याच्या गाडीच्या चालकाने कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केली होती. यामुळे त्याला चलन भरावे लागले. मुंबई पोलिसांनी नो पार्किंग झोनमध्ये कार्तिक आर्यन याची कार उभी असल्याने चलन फाडले आहे.

कार्तिक आर्यन हा शहजादा चित्रपटामध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी 58 शेकंदांच्या फर्स्ट लूक व्हिडीओ चित्रपटाचा शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये कार्तिक आर्यन याचा लूक जबरदस्त दिसत होता. शहजादा या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत क्रिती सेननही महत्वाच्या भूमिकेत आहे.

शहजादा चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन हे जालंधरमधील लवली यूनिवर्सिटीमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अंदाज बांधला होता की, कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांनी गुपचूप पध्दतीने लग्न केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.