मुंबई : आज सर्वत्र फक्त आणि फक्त एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू गाण्याची चर्चा सुरू आहे. याचे कारणने तेवढेच जबरदस्त आहे. कारण या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये डंका वाजवली. एसएस राजामौली यांच्यासह आरआरआर चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. नाटू-नाटू गाण्याने एक इतिहासच रचला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये 2023 मधील सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार नाटू-नाटू या गाण्याला मिळाला आहे. लेखक गीतकार चंद्रबोस यांनी एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांचे आभार मानले आहेत.
नाटू-नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर चंद्रबोस यांनी धन्यवाद मानत म्हटले, आजचा दिवस माझ्या आयुष्यामधील सर्वात आठवणीमध्ये राहणारा दिवस आहे. नाटू-नाटू गाण्याचा गीतकार असल्याने मला या यशाचा खूप जास्त आनंद आणि अभिमान वाटत आहे.
एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांचे मी स्पेशल आभार मानू इच्छित आहे. नाटू-नाटू गाणे पूर्ण तयार करण्यास १७ महिन्यांचा कालावधी लागला होता.
????❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ pic.twitter.com/3S4qmNKT4f
— chandrabose (@boselyricist) January 11, 2023
हे गाणे अर्ध्या दिवसांमध्येच ९० टक्के पूर्ण झाले होते. परंतू १० टक्के पूर्ण करण्यासाठी तब्बल १७ महिन्यांचा कालावधी लागला. नाटू-नाटू गाण्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांनी जबरदस्त डान्स केलाय.
नाटू-नाटू हे गाणे कालभैरव आणि राहुल यांनी गायले आहे. नाटू-नाटू गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी चित्रपट टीमचे अभिनंदन केले.