Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी

नागराज मंजुळे यांच्या सैराटच्या तुफान यशानंतरचा हा बिग बींसोबतचा सिनेमा अनेकांचं लक्ष वेधतोय. मात्र अश्यात झुंडवर बंदी घाला अशी मागणी होतेय. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्यासाठी हा मोठा धक्काच म्हणावं लागेल.

Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी
JhundImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:30 AM

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड (Jhund) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सगळीकडे याच सिनेमाविषयी बोललं जातंय. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांचा अभिनय, सिनेमाची कथा याबद्दल सर्वत्र बोललं जातंय. हिंदीतील टॉप दिग्दर्शकांनी या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं.”भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे”, असं एका दिग्दर्शकाने म्हटलंय. इतकंच काय आमिर खानही (Amir Khan) या सिनेमाबद्दल भरभरून बोलला. एका क्रिडा शिक्षक आणि त्याचे झोपडपट्टीतील विद्यार्थी यांच्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. नागराज मंजुळे यांच्या सैराटच्या तुफान यशानंतरचा हा बिग बींसोबतचा सिनेमा अनेकांचं लक्ष वेधतोय. मात्र अश्यात झुंडवर बंदी घाला अशी मागणी होतेय. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्यासाठी हा मोठा धक्काच म्हणावं लागेल.

झुंडवर बंदीची मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमाचा सर्वत्र बोलबाला आहे. अश्यात “हा सिनेमा स्थगित करा”, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. हैद्राबादमधले चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी झुंडविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली.

निर्मात्याला 10 लाखांचा दंड

या प्रकरणी सुनावणी करताना तेलंगणा उच्च न्यायालयाने निर्माते नंदी चिन्नी कुमार यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने त्यांना ही रक्कम एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने रक्कम वेळेत न भरल्यास जिल्हाधिकार्‍यांनी 30 दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून ती पीएम फंडात पाठवावी, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

चित्रपटाचं कथानक

अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली.

संबंधित बातम्या

महिला दिन विशेष : आई-वडील नव्हे तर ‘या’ व्यक्तीमुळे प्रियांका चोप्रा झाली मिस वर्ल्ड, जाणून घ्या कोण आहे ‘ही’ व्यक्ती…

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

Rashmika Mandana Varun Dhawan | रश्मिकाची लवकरच बॉलिवूडमध्ये इन्ट्री? वरुण धवनसोबत दिसली नॅशनल क्रश

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.