Jhund movie : प्रतिक्षा संपली, नागराज पोपटराव मंजुळेंचा ‘झुंड’ प्रदर्शनासाठी सज्ज, तारीख निश्चित
बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.
मुंबई – नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. कोरोनाच्या काळात चाहत्यांना उत्सुकता लागलेल्या झुंड सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु नागराज मंजुळे यांनी फेसबुकला पोस्ट करून चित्रपट रिलीजची तारीख स्पष्ट केली आहे. रिलीज होणारी पोस्ट सोशल मीडियावर पडल्यापासून चित्रपटातील कथा, गाणी अशा अनेक गोष्टींवर नेटक-यांनी चर्चा सुरू केली आहे. सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे. नागराजचा बॉलिवूडमधील पदार्पण कसं असेल किंवा चित्रपटात काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. पोस्टरची चर्चा
आज सकाळी नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी फेसबुकला पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी हा चित्रपट तुम्हाला 4 मार्चला थिअटरमध्ये पाहायला मिळेल असं म्हणाले आहेत. तसेच त्यांनी एक बॅनर शेअर केलं आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन स्पोर्टस लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. बच्चनच्या हातात एक फुटबॉल असून झुंड नही टीम कहीये असं म्हणटलं आहे.
View this post on Instagram
चित्रपटाबाबत पसरली होती अफवा
कोरोना काळात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. तसेच तयार असलेले चित्रपट रिलीज करण्यास परवानगी नव्हती. त्याचबरोबर सरकारच्या कठोर नियमावली असल्याने अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. झुंड हा चित्रपट तयार असताना सुध्दा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत रिलीज करण्यात आला नव्हता. मध्यतंरी अफवा सुध्दा पसरली होती, की हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवरती पाहायला मिळणार पण या सगळ्या अफवा असल्याचं नागराज मंजुळे यांनी सांगितलं होतं.
दोन वर्ष वेळ लागला बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.
ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.