नव्या नवेली नंदा करत आहे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण

| Updated on: Dec 11, 2022 | 5:59 PM

यामध्ये काही दिवसांपूर्वीच तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन सहभागी झाल्या होत्या.

नव्या नवेली नंदा करत आहे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण
Follow us on

मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. नुकताच दोघेसोबतच स्पाॅट झाल्याने आता तर चर्चांना उधाण आले आहे. नव्याच्या वाढदिवसानिमित्त मामा अभिषेक बच्चन याने खास एक पोस्ट सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच शेअर केली होती. नव्या एक स्वत: चा शो चालवते. यामध्ये काही दिवसांपूर्वीच तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन सहभागी झाल्या होत्या.

नव्या जरी आज बाॅलिवूड चित्रपटांपासून चार हात दूर असली तरीही नव्या कायमच चर्चेत असते. नव्या तिच्या शोमध्ये अनेकदा मोठे खुलासे देखील करते. जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच नव्याला रिलेशनबद्दल खास टिप्स दिल्या होत्या.

नुकताच नव्या चित्रपट निर्माते अमृतपाल सिंह बिंद्रा याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती पार्टीमधून निघताना सिद्धांत चतुर्वेदी याच्या गाडीमधून जाताना दिसली. विशेष म्हणजे सिद्धांत आणि नव्या दोघेही स्माईल देताना दिसले.

नव्या ही सिद्धांतला डेट करत असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. आता या दोघांचेसोबत जातानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकाच रंगाच्या ड्रेसमध्ये पार्टीत पोहचले होते.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा गहराइया हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. मात्र, सिद्धांत आणि नव्या यांनी आपल्या रिलेशनवर अजून काही भाष्य केले नाहीये.