कौटुंबिक कलहाने ग्रासलेला नवाजुद्दीन सिद्दीकी राज ठाकरे यांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कौटुंबिक कलहाने ग्रासलेला नवाजुद्दीन सिद्दीकी राज ठाकरे यांच्या भेटीला, नेमकं कारण काय?
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 4:30 PM

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवाजुद्दीन याने आज राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलहात अडकला आहे. नवाजुद्दीनचा गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीपासून वाद सुरु आहे. ते बारा वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. पण आता मुलांवरुन दोघांमध्ये सातत्याने वाद होताना दिसत आहेत. दोघांमधील वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. या वादामुळे नवाजुद्दीन हा अडचणीत आलेला आहे.

नवाजुद्दीन वैयक्तिक आयुष्यात अशा परिस्थितीतून जात असताना त्याने आज अचानक राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण नवाजुद्दीन याने राज ठाकरे यांची अनौपचारिक भेट घेतल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. नवाजुद्दीन याने अनेक प्रसिद्ध चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केलंय. त्याने ‘ठाकरे’ चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं होतं.

नवाजुद्दीन याचा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानाचा एक फोटो समोर आलाय. या फोटोत अभिजीत पानसेदेखील दिसत आहेत. याशिवाय राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे देखील या फोटोत दिसत आहेत. नवाजुद्दीने आगामी नव्या चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊ शकतो. पण याबद्दल अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नवाजुद्दीनच्या पत्नीचे बलात्काराचे आरोप

दरम्यान, नवाजुद्दीन याची पत्नी आलिया सिद्दीकी ही त्याच्यावर सातत्याने सतत गंभीर आरोप करत आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे भांडण आता थेट कोर्टात पोहचले असून आलियाचे आरोप ऐकून अभिनेत्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आयुष्यामधील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्येही तिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप करत आपल्या मुलांना आपल्यापासून दूर करत असल्याचे तिने म्हटले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर थेट बलात्काराचा देखील आरोप केलाय. या व्हिडीओमध्ये आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी हा चांगला बाप नसल्याचे देखील म्हटले असून त्याने कधीच आपल्या मुलांना बापाचे प्रेम दिले नसल्याचे म्हटले. तो त्याच्या पाॅवरचा चुकीचा वापर करत असल्याचाही आरोप आलियाने केला.

नवाझुद्दीन सिद्दीकीकडून हेबियस कॉर्पस याचिका दाखल

दरम्यान, नवाझुद्दीन सिद्दीकी याने हेबियस कॉर्पस याचिका पत्नीकडे असलेल्या मुलांचा ठावठिकाण समजावा म्हणुन दाखल केलीये. याच याचिकेवर नुकताच सुनावणी देखील झाली. नवाझुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आणि मुले दुबईचे नागरिक असून अभिनेत्याच्या मुलांना दुबईतील शाळेत घालण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांपासून नवाझुद्दीन सिद्दीकी याचे मुले भारतामध्ये असून शाळेत ते गैरहजर आहेत. दोन्ही मुले त्यांच्याकडे असून मुलगी ही आईकडेच राहणार असल्याचे आणि परदेशातील शाळेत शिक्षण घेण्यावर ठाम आहे, असा दावा वकिल रिझवान मर्चंट यांनी केला आहे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.