भारत देश सोडून दुबईला जाणार नवाजुद्दीन सिद्दिकीचं कुटुंब! पत्नी आलियाने सांगितलं ‘हे’ कारण

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आपल्या कुटुंबासह दुबईला जाण्याची तयारी करत आहे. गेल्या काही वर्षांपासून नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील बिघडलेल्या नाते संबंधांच्या बातम्या समोर येत होत्या.

भारत देश सोडून दुबईला जाणार नवाजुद्दीन सिद्दिकीचं कुटुंब! पत्नी आलियाने सांगितलं ‘हे’ कारण
आलिया-नवाजुद्दीन
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 2:51 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आपल्या कुटुंबासह दुबईला जाण्याची तयारी करत आहे. गेल्या काही वर्षांपासून नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील बिघडलेल्या नाते संबंधांच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे, असे दिसते आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, नवाजुद्दीन आता त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सुट्टीवर घेऊन जाणार आहे. जिथे त्याला त्यांच्यासोबत काही मोकळा वेळ घालवायचा आहे. कुटुंब एकत्र आल्यानंतर, नवाज सर्वांसोबत सहलीला जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.

दुबईत स्थायिक होण्याविषयी आलिया म्हणते…

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया म्हणाली की, ‘हे खरे आहे की, आम्ही दुबईला जात आहोत. दुबईला गेल्यानंतर, आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी, आता तिथेच राहतील आणि पुढे शिक्षण देखील तिथेच घेतील. भारतात सध्या ऑनलाईन अभ्यास होत आहेत. आम्हाला वाटते की येत्या काही वर्षांसाठी हे असेच होणार आहे. ज्यामुळे आम्ही आमच्या मुलांना दुबईच्या शाळेत दाखल केले आहे. कारण ऑनलाईन अभ्यासादरम्यान वातावरण योग्य नाही आणि मुले नीट अभ्यास करू शकत नाहीत, वर्गातील शिक्षण पूर्णपणे वेगळे आहे. आम्हाला लवकरच दुबईला जाण्यासाठी तिकिटे मिळणार आहेत.’

नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण

आलिया आणि मुलांना सोडून नवाजुद्दीन सिद्दीकी काही दिवसात लंडनला रवाना होणार आहे.  असे वृत्त आहे की, अभिनेता त्याचा पुढील चित्रपट ‘हिरोपंती 2’चे शूटिंग येथे सुरू करेल. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या नवाज आपल्या कुटुंबासह खूप आनंदी आहे. नवाज आणि त्याची पत्नी दोन्ही मुलांसमवेत कसारा येथील नवाजच्या फार्महाऊसवर आहेत.

संजय दत्तदेखील दुबईत स्थायिक

काही महिन्यांपूर्वी संजय दत्त देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुबईला शिफ्ट झाला आहे. तो आता थेट दुबईतूनच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतो. यासह, हे कलाकार काम करण्यासाठीच मुंबईत येतात, आणि काम संपल्यानंतर लगेच दुबईला परततात. अगदी सुरुवातीपासूनच दुबई बॉलिवूड स्टार्सची पहिली पसंती आहे. यामुळे आता नवाजही आपल्या कुटुंबाला तिथेच स्थायिक करणार आहे.

(Nawazuddin Siddiqui moving to Dubai with family)

हेही वाचा :

राज कुंद्राच्या जामिनाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, न्यायालयीन कोठडीविरोधात दाखल केला होता अर्ज!

 करण जोहरला ‘या’ गोष्टीचा फोमो’, म्हणूनच जाणार नाही ‘बिग बॉस’च्या घरात!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.