Supriya Sule | सुप्रिया सुळे आहेत शाहरुख खान याच्या मोठ्या फॅन, पठाण चित्रपटावर म्हणाल्या लोक हे फक्त…

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे.

Supriya Sule | सुप्रिया सुळे आहेत शाहरुख खान याच्या मोठ्या फॅन, पठाण चित्रपटावर म्हणाल्या लोक हे फक्त...
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 4:55 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट चार दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. हा चित्रपट पाहून अनेकांनी शाहरुख खान (Shah Rukh Khan याचे काैतुक केले. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटा विषयी क्रेझ दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये ५४ कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. जगभरातून १०० कोटींचे कलेक्शन करत पठाण चित्रपटाने धमाका केला. तसेच विकेंडचा फायदा देखील चित्रपटाला होण्याची शक्यता आहे. पठाण चित्रपट रिलीज होण्याचा अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाचे कारण म्हणजे दीपिका पादुकोण हिने पठाण चित्रपटामध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. पठाण चित्रपटामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. मात्र, या वादाचा काही तोटा चित्रपटाला झाला नसल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन वरून स्पष्ट होते आहे.

सोशल मीडियावरही शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. दीपिका पादुकोण हिचे देखील पठाण चित्रपटासाठी काैतुक केले जातंय.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील पठाण चित्रपटाच्या फॅन झाल्या असून पठाण चित्रपट बघितल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शाहरुख खान याचे तोंड भरून काैतुक केले आहे.

इतकेच नाहीतर सुप्रिया सुळे यांनी थेट लोक शाहरुख खान याच्यावर जळतात, असेही म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, मी शाहरुख खान याची मोठी फॅन आहे.

पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोक शाहरुख खान याच्या सक्सेसवर जळतात. शाहरुख खान हा भारताचा सुपरस्टार आहे. दीपिका पादुकोण हिने देखील चित्रपटामध्ये जबरदस्त भूमिका केल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

पहिल्या दिवशी पठाण चित्रपटाने 57 कोटी, दुस-या दिवशी 70.50 कोटी आणि तिसर्‍या दिवशी 36 कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन भारतामध्ये केले आहे. भारतात एकूण 163.50 कोटींची कमाई पठाण चित्रपटाने केली आहे. जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर 280 ते 290 कोटींचे अंदाजे बाॅक्स आॅफिस कलेक्शन चित्रपटाने केले आहे.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....