“द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचं पंतप्रधान मोदी अधिकृत पत्र
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित "द काश्मीर फाईल्स' सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या", अशी मागणी केली आहे.
मुंबई : सध्या ‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files) सिनेमा खूप चर्चेत आहे. नुकतंच या सिनेमाने कमाईचा 200 कोटींचा आकडा पार केलाय. “या सिनेमाच्या कमाईतील काही भाग काश्मीरी पंडितांची (Kashmiri Pandit) घरं बांधण्यासाठी द्या”, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलाताना म्हटलं. आता राष्ट्रवादीच्या वतीने थेट पंतप्रधान मोदी (PM Narendtra Modi) अधिकृत पत्र लिहीत ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही मागणी केली आहे. “द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, अशी मागणी बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
काल विधानसभेत अनुदान मागणीवर चर्चा सुरू असताना विरोधी बाकावरील आमचे सहकारी राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडून काश्मीर फाईल्स चित्रपट पहायला गेले होते. या चित्रपटाने १५० कोटी इतकी कमाई केली. हे पैसे काश्मिरी पंडितांची घरे बांधण्यासाठी दान करण्याची विनंती भाजपने निर्मात्याकडे करावी. pic.twitter.com/7DQ6NuoC79
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 23, 2022
राष्ट्रवादीचं पंतप्रधानांना पत्र
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित “द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, अशी मागणी केली आहे.
#द #काश्मीर #फाइल्स या सिनेमाला मिळालेल्या उत्पादनातून या सिनेमाचे निर्माते यांनी काश्मीर पंडितांच्या मुलांसाठी तिथल्या आरोग्यसेवेसाठी तिथल्या घरांसाठी या नफ्यातून पुनर्वसनासाठी काश्मिरी पंडितांना निधी द्यावा@NCPspeaks @PMOIndia @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/kMc0WNyFw2
— Babasaheb patil (@babasah05455374) March 23, 2022
“आपण काश्मीर फाईल्स चित्रपट हा तसा आपण म्हणत आहात की सत्य परिस्थितीवर आधारीत आहे आणि यात काश्मिरी पंडित यांच्यावर अनन्वीत अत्याचार करुन त्यांना काश्मीर मधून बाहेर काढण्यात आले आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी खुद्द आपण, भाजपचे खासदार, आमदार, सर्व मंत्री आणि एकूणच भाजप ची सर्व यंत्रणा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुण लोकांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पहावा यासाठी आवाहन करत आहे.नुकतंच या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक जास्त गल्ला जमवला आहे. हि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला माहीत असेलच की 1990 साली काश्मीर पंडित विस्थापित झाले त्यावेळी आपल्या पक्षाने पाठिंबा दिलेले केंद्रात सरकार होते आणि काश्मीर मधील तत्कालीन राज्यपाल ही आपलेच होते. तरीही आपण काश्मीर पंडितांना काही मदत करू शकला नाहीत, मात्र आपण आपल्या मुलाखतीतून हे म्हणत आहात की काश्मीर पंडित यांसाठी काँग्रेसने काहीही केले नाही. जे काही केले ते भाजपने केले, तरी माझी आपल्याकडे मागणी आहे की त्यावेळी काही केले नाही मात्र आता आपण काश्मिर पंडितांना मदत करू शकता”, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे.
“जो काही या चित्रपटातून नफा मिळाला आहे तो लोकांनी पाहिलेल्या या चित्रपटामुळे मिळालेला आहे तरी या नफ्यातील काही टक्के भाग आपण कश्मीर पंडितांच्या पुनर्वसनासाठी (मुलांचे शिक्षण, त्यांची घरे, योग्य आरोग्य सुविधा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनाचा दर्जा उंचावेल अशा सुविधांकरिता) द्यावा, अशी मागणी करत आहे. मला आशा की आपण या मागणीचा नक्की विचार कराल आणि काश्मिरी पंडितांविषयी असणारे आपले प्रेम फक्त चित्रपटातून न दाखवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवाल. माझी ही मागणी आपण नक्कीच पूर्ण कराल ही मला खात्री आहे”, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे.
तसंच या सिनेमाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनाही राष्ट्रवादीच्या वतीने पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यांच्याकडेही हीच मागणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या