Neetu Kapoor | नीतू कपूरची कोरोनावर मात, लवकरच ‘जुग जुग जियो’चे शूटिंग सुरू करणार!

मुंबई : दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरने बऱ्याच दिवसानंतर तिच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. चंदिगडमध्ये शूटिंगदरम्यान नीतू कपूरचा कोरोना रिसोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याची माहिती मुलगी रिद्धिमा कपूरने दिली. रिद्धिमाने ही बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (Neetu Kapoor defeats Corona) रिद्धिमा कपूरने आईबरोबर एक फोटो […]

Neetu Kapoor | नीतू कपूरची कोरोनावर मात, लवकरच 'जुग जुग जियो'चे शूटिंग सुरू करणार!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 8:03 PM

मुंबई : दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरने बऱ्याच दिवसानंतर तिच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. चंदिगडमध्ये शूटिंगदरम्यान नीतू कपूरचा कोरोना रिसोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याची माहिती मुलगी रिद्धिमा कपूरने दिली. रिद्धिमाने ही बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (Neetu Kapoor defeats Corona) रिद्धिमा कपूरने आईबरोबर एक फोटो शेअर केला आहे, कॅप्शनमध्ये रिद्धिमाने लिहिले आहे की, “तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद त्याबद्दल धन्यवाद.” गुरुवारी नीतूने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. स्वत: वेगळे ठेवले होते.

नीतूने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, “या आठवड्याच्या सुरुवातीला मला मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले जात आहे. सर्व प्रशासनाचे आभारी आहे. मी स्वत: ला वेगळे ठेवले आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार औषधे घेत आहे आणि बरे वाटत आहे. ” चंदिगडमध्ये नीतू कपूर तिच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होत्या. आणि त्याच वेळी 4 डिसेंबर रोजी बातमी समोर आली होती की, तिचे सहकलाकार वरुण धवन तसेच चित्रपटाची दिग्दर्शक राज मेहता कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

बॉलिवूड वरूण धवन अभिनेत्री कियारा अडवाणी आणि जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचे चंदिगडमध्ये ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. मात्र,  या चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. या चित्रपटाच्या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे झाली होती.

वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे दोघेही या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ही जोडी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’ या चित्रपटातील एका गाण्यामध्ये दिसली होती. ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुण धवन व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह यांनी नुकतेच चित्रीकरणादरम्यान सेटवरील त्यांचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होता. या फोटोत नीतू शॉटसाठी तयार होताना दिसल्या होत्या. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच चित्रीकरण करत आहेत. नीतूला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत नीतू यांनी लिहिले की, ‘बऱ्याच वर्षानंतर मी सेटवर परत येत आहे. एक नवीन सुरुवात आणि चित्रपटांची जादू आहे. मला थोडी भीती वाटते पण, मला माहित आहे की तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस.’

संबंधित बातम्या : 

KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!

‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ वेब सीरीज ठरली, भारतातील सर्वात आवडती!

(Neetu Kapoor defeats Corona)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.