Valentine’s Day 2023 | ‘व्हॅलेंटाईन डे’ची झलक नीतू कपूर यांनी दाखवली, मुलगी रिद्धिमा कपूर, सून आलिया भट्ट आणि रणबीर…
नीतू कपूर यांच्या या व्हॅलेंटाईन डेच्या पोस्टवर रिद्धिमा कपूर हिने कमेंट करत हार्ट इमोजी पाठवले आहेत. करिश्मा कपूर हिने देखील या पोस्टवर हार्ट इमोजी सेंड केले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) स्पेशल असून या फोटोच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर, जावई भरत साहनी दिसत आहेत. विशेष म्हणजे सर्वांनी काळे कपडे घातले असून व्हॅलेंटाईन डे धुमधडाक्यात साजरा करण्यात आल्याचे हे फोटोवरून स्पष्ट होत आहे. हा फोटो (Photo) शेअर करताना नीतू कपूर यांनी खास कॅप्शन दिले असून त्यांनी माय व्हॅलेंटाईन वर्ल्ड असे लिहिले आहे. नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्वजण कॅमेऱ्याकडे पाहून पोज देताना दिसत आहेत. आता नीतू कपूर (Neetu Kapoor) यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
नीतू कपूर यांच्या या व्हॅलेंटाईन डेच्या पोस्टवर रिद्धिमा कपूर हिने कमेंट करत हार्ट इमोजी पाठवले आहेत. करिश्मा कपूर हिने देखील या पोस्टवर हार्ट इमोजी सेंड केले आहेत. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट केलीये.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीचे नाव नीतू कपूर यांनीच ठेवले आहे. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत आपल्या मुलीचे नाव जाहिर केले होते.
यासोबतच आलिया भट्ट हिने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थही सांगून टाकला होता. आलिया आणि रणबीर कपूर यांच्या मुलीचे नाव राहा कपूर असे ठेवले आहे. मात्र, आलिया आणि रणबीरच्या मुलीची झलक अजूनही चाहत्यांना बघायला मिळाली नाहीये.
View this post on Instagram
काही दिवसांपुर्वी आलिया भट्ट हिने योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे डिलीवरीला अवघे दीड महिने झाले असताना आलिया अत्यंत अवघड पध्दतीचा योगा करताना दिसली होती.
आलिया भट्ट हिचा तो योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. एरियल योगा आलिया भट्ट करत होती. आलिया भट्ट हिने तो योगाचा व्हिडीओ शेअर करताना मोठी पोस्टही शेअर केली होती.
आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. डिलीवरीनंतर काही दिवसांमध्येच आलियाने आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यासही सुरूवात केलीये. जिमला जातानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ कायमच आलियाचे व्हायरल होतात.