Net Worth | अभिनेत्री नव्हे तर बॉलिवूडमध्ये अभिनेते सर्वाधिक श्रीमंत, पाहा टॉप 5मध्ये कोणाकोणाचा समावेश?
जरी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक प्रसिद्ध स्टार आहेत, पण जेव्हा बॉलिवूड स्टार्सचा विचार केला जातो, तेव्हा ते सर्व त्यांच्या समोर फिकट दिसतात. बॉलिवूड स्टार्स प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहेत. मग ते चाहत्यांच्या बाबतीत असो किंवा कमाईच्या बाबतीत.
मुंबई : जरी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक प्रसिद्ध स्टार आहेत, पण जेव्हा बॉलिवूड स्टार्सचा विचार केला जातो, तेव्हा ते सर्व त्यांच्या समोर फिकट दिसतात. बॉलिवूड स्टार्स प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहेत. मग ते चाहत्यांच्या बाबतीत असो किंवा कमाईच्या बाबतीत. आपल्या सर्वांना माहित आहे की, या स्टार्सची कमाई मुख्यतः त्यांच्या चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. तर आपण अंदाज लावू शकतो की या स्टार्सची एकूण मालमत्ता किती असेल. पण आज आपण अशा पाच अभिनेत्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत कलाकार म्हटले जाते. सर्वाधिक मालमत्तेच्या या यादीत पहिल्या 5 मध्ये कोणते काळकर सामील आहेत, ते जाणून घेऊया…
शाहरुख खान
GQ India मधील एका रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुख खानचे नाव या यादीत सर्वात वर येते. अभिनेता आजकाल ड्रग्स प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना टाळताना दिसत आहे. भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खानची संपत्ती सर्वाधिक आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा किंग खान सुमारे 5100 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
अमिताभ बच्चन
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मेगास्टार अमिताभ बच्चन आहेत. अमिताभ बच्चन हे इंडस्ट्रीचे असे कलाकार आहेत, ज्यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे, जी अजूनही सुरू आहे. 1969मध्ये सात हिंदुस्तानी चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चन यांची संपत्ती 2950 कोटी आहे.
सलमान खान
सलमानच्या अनेक बॉलिवूड चित्रपटांनी 100 कोटी रुपयांच्यावर व्यवसाय केला आहे. हे आश्चर्यकारक नाही की सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, सलमान खानची एकूण मालमत्ता 2255 कोटी रुपये आहे.
अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमार कमाईच्या बाबतीतही कोणापेक्षा कमी नाही. अक्षय कुमार एका वर्षात चार ते पाच चित्रपट करून भरपूर पैसे कमवतो. या व्यतिरिक्त, अक्षय कुमार ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, अक्षयची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये आहे.
आमिर खान
या यादीत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा समावेश नसेल, असे कसे होईल… आमिर खानच्या कारकीर्दीत त्याने केवळ यशाचा मार्ग निवडला आहे. तो एका वर्षात फक्त एकच चित्रपट करतो, पण तो त्यातून चाहत्यांची मने जिंकतो. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, आमिर खानने त्याच्या चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून एकूण 1562 कोटी रुपये कमावले आहेत.
हेही वाचा :
Nora Fatehi ED | सुकेश शेखर 200 कोटी फसवणूक प्रकरण, नोरा फतेही ईडी कार्यलयात दाखल, चौकशी सुरु
Nora Fatehi | शॉर्ट्स परिधान करून इंग्रजी गाण्यावर थिरकली नोरा फतेही, पाहा तिचा अतरंगी डान्स Video
Manasi Naik-Pradip Kharera : कपल गोल्स, पाहा अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचं नवं फोटोशूट
Lookalike : हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडॉट सारखी दिसते लिस, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य