200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेहीला ईडीचे समन्स, अभिनेत्रीची चौकशी होणार!

दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले आहे. नोराला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे.

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेहीला ईडीचे समन्स, अभिनेत्रीची चौकशी होणार!
Noora Fatehi
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 11:44 AM

मुंबई : दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले आहे. नोराला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणी नोरा फतेही हिचा जबाब नोंदवायचा आहे.

सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलिनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक कलाकारांना अडकवण्याचा प्रयत्न केला!

याआधी जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटले की, जॅकलिन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची व्हिक्टीम आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आज (14 ऑक्टोबर) होणाऱ्या चौकशीत नोरा सहभागी होईल की, नाही हे अद्याप ठरलेले नाही. सुकेशचंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल तिहार जेलच्या आतून 200 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की, इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते.

लीनाच्या मदतीने तो तुरुंगात बसून फसवणूक करायचा!

फसवणुकीच्या प्रकरणात सुकेशची कथित पत्नी लीना पॉलही पोलिसांच्या ताब्यात आहे. फसवणुकीच्या प्रकरणात लीनाने सुकेशला पूर्ण पाठिंबा दिला. तुरुंगातूनच सुकेश लीनाच्या माध्यमातून आपले फसवणुकीचे नेटवर्क चालवत होते. अटक केल्यानंतर लीनाने चौकशीत सांगितले होते की, ती सुधीर आणि जोएल नावाच्या दोन लोकांसोबत फसवणूक झालेले पैसे लपवण्यासाठी वापरत होती.

अहवालांनुसार, हा खटला सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे. रोहिणी तुरुंगात अंडर ट्रायल सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या 20 स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. याआधी जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात साक्षीदार म्हणून नवी दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा :

Lookalike : हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडॉट सारखी दिसते लिस, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Nusrat bharucha : नुसरत भरूचाने डेनिम जॅकेटमध्ये दाखवला बोल्ड अंदाज, पाहा किलर फोटो

Happy Birthday Parmeet Sethi | अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांची कुंडली पाहून ज्योतिषी हैराण झाले, जाणून घ्या काय होते कारण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.