Video | डान्स मेरी रानी गाण्यावर ‘या’ गायकासोबत ठुमके मारताना दिसली नोरा फतेही, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले
नोरा फतेही हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. नोरा फतेही हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नोरा फतेही हिचे नाव सुकेश चंद्रेशखर प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी थेट नोरा फतेही हिच्यावर टिका देखील केली.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नोरा फतेही (Nora Fatehi) हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. नोरा फतेही हिला सुकेश चंद्रशेखर याने अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. मात्र, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने आपल्याला काहीच गिफ्ट दिले नाही आणि आपण त्याच्या थेट संपर्कात नसल्याचे देखील काही दिवसांपूर्वीच नोरा फतेही हिने स्पष्ट केले. असे सांगितले जात होते की, सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही हिला अत्यंत महागडी कार आणि बऱ्याच महागड्या वस्तू या गिफ्ट (Gift) केल्या आहेत.
नोरा फतेही ही तिच्या बोल्डनेससाठी आणि तिच्या डान्ससाठी चर्चेत असते. विशेष म्हणजे नोरा फतेही ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करताना नोरा दिसते. सोशल मीडियावर नोरा फतेही हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. नोरा हिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
नुकताच नोरा फतेही हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये नोरा ही डान्स करताना दिसत आहे. नोरा फतेही हिचा हा व्हिडीओ विदेशातील आहे. डान्स मेरी रानी या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना नोरा फतेही ही दिसत आहे. नोरा फतेही हिच्या या व्हिडीओमध्ये अजून एक गोष्ट खूप जास्त स्पेशल आहे.
View this post on Instagram
सिंगर रेमा सोबत चक्क नोरा फतेही ही डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सिंगर रेमा हा देखील नोरा फतेही हिच्यासोबत डान्स मेरी रानीवर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ एका लाईव्ह शोमधील असल्याचे दिसत आहे. नोरा फतेही आणि सिंगर रेमा यांना एक सोबत डान्स करताना पाहून प्रेक्षक देखील आनंदी झाल्याचे दिसत आहेत.
शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक हे नोरा फतेही आणि सिंगर रेमा यांचा डान्स मोबाईलमध्ये शूट करताना दिसत आहेत. आता सिंगर रेमा आणि नोरा फतेही यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. काहींनी व्हिडीओ कमेंट करत नोरा फतेही हिच्या डान्सचे काैतुक देखील केले आहे.