फीफा वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेही हिने केला तिरंग्याचा अपमान?, सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण नोरावर टीका करताना दिसत आहे.

फीफा वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेही हिने केला तिरंग्याचा अपमान?, सोशल मीडियावर संतापाची लाट
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 6:03 PM

मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये फिफा फॅनफेस्टमध्ये बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने स्टेजवर धमाकेदार डान्स केला. मात्र, सध्या नोरा फतेही मोठ्या वादात सापडलीये. कारण यावेळीची तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण नोरावर टीका करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर नोरा आलीये. नेटकरी या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून नोरावर टीका करत आहेत. आता हे प्रकरण इतके जास्त वाढले आहे की, अनेकजण नोरावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहेत.

नोराने फिफा फॅनफेस्टमध्ये ओ साकी साकी आणि ना मेरी रानी या गाण्यावर डान्स केला. जेंव्हा नोराचा डान्स झाला त्यावेळी एका चाहत्यांने तिला भारताचा तिरंगा दिला. मात्र, यावेळी नोराने एखाद्या ओढणीसारखा वापर तिरंग्याचा केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतकेच नाही तर ज्यावेळी नोराच्या हातामध्ये तिरंगा आला त्यावेळी तिने तो उलडा धरून फडकावला. तिरंग्याचा सन्मान न करता रूमालासारखा तिने हातामध्ये तिरंगा पकडला. हे पाहून नेटकऱ्यांचा पारा चांगलाच चढला आहे.

काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, नोराने तिरंगा थेट ओढणीसारखा पकडून स्वत: भोवती गुंडाळला देखील. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने आता नोराच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये.

नोराने ज्यावेळी तिरंगा चाहत्याकडे तिला त्यावेळीही तिने सन्मान पूर्ण न देता गुंडाळून दिल्याने नोराविरोधात संताप हा सोशल मीडियावर वाढताना दिसतोय. आता याप्रकरणात नोरा काय स्पष्टीकरण देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीचे नाव आले होते. त्यानंतर नोराला चाैकशीसाठी देखील बोलवण्यात आले होते.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.