Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Ranbir Kapoor | आलिया भट्टच नाही तर आधीही अनेक वेळा प्रेमात पडलाय रणबीर कपूर, ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!

बॉलिवूडच्या ‘चॉकलेट बॉय’पैकी एक असणारा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चाहत्यांच्या हृदयात राज्य करतो. रणबीरने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी रणबीर कपूरचा वाढदिवस आहे.

Happy Birthday Ranbir Kapoor | आलिया भट्टच नाही तर आधीही अनेक वेळा प्रेमात पडलाय रणबीर कपूर, ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!
Ranbir Kapoor
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:04 AM

मुंबई : बॉलिवूडच्या ‘चॉकलेट बॉय’पैकी एक असणारा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चाहत्यांच्या हृदयात राज्य करतो. रणबीरने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. ‘सावरिया’ या चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात करणारा रणबीर आजच्या युगातील मुलींचा आवडता अभिनेता आहे.

केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर बॉलिवूड सुंदरींसहही त्याचे नाव अनेक वेळा जोडले गेले आहे. दीपिका पदुकोणपासून आलिया भट्टपर्यंत त्याचे नाव सर्व अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. आज, रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या प्रेमाच्या काही खास चर्चांबद्दल…

अवंतिका मलिक

रणबीर कपूरने अभिनेता इम्रान खानची पत्नी अवंतिका मलिकलाही एका वेळी डेट केले होते. अवंतिका आणि रणबीर एकत्र अभ्यास करायचे. असं म्हटलं जातं की,  अवंतिका जेव्हा ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकेत काम करत होती, तेव्हा रणबीर तिला भेटण्यासाठी मालिकेच्या सेटवर पोहोचत असे. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही.

सोनम कपूर

रणबीर कपूर आणि सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटादरम्यान, रणबीर आणि सोनम रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या होत्या. तथापि, लवकरच दोघेही वेगळे झाले. ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर सोनम कपूर याबद्दल मोकळेपणाने बोलली होती.

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या प्रेमाच्या चर्चा आजही केल्या जातात. ‘बचना ए हसीनो’ चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. रणबीर आणि दीपिकाने त्यांचे नाते कधीच लपवले नाही. दोघांनीही त्यांचे नाते उघडपणे स्वीकारले होते. मात्र, जेव्हा दोघांचे ब्रेकअप झाले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. रणबीरपासून विभक्त झाल्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती.

नर्गिस फाखरी

रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ चित्रपट ब्लॉकबस्टर होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री नर्गिस फाखरी दिसली. नर्गिस फाखरीसोबतचे त्याचे नाते चित्रपटादरम्यानही चर्चेत आले. असे म्हटले जाते की, शूटिंग दरम्यान दोन्ही कलाकार एकमेकांना पसंत करू लागले होते.

कतरिना कैफ

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पहिल्यांदा ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. दोघांचे काही फोटो व्हायरल झाल्यावर रणबीर आणि कतरिनाच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले होते. दोघेही ऑफ कॅमेरा एकमेकांशी जवळीक साधताना दिसले, पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.

आलिया भट्ट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर जवळ आले. दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. असे म्हटले जात आहे की, या वर्षाच्या अखेरीस रणबीर कपूर आलिया भट्टशी लग्न करेल.

हेही वाचा :

Happy Birthday Ranbir Kapoor : ‘रॉकस्टार’ ते ‘संजू’ पर्यंत, रणबीर कपूरने ‘या’ चित्रपटांमध्ये दाखलली आपल्या अभिनयाची जादू

Munmun Dutta Birthday: कधी वाद-विवाद तर कधी अफेअरमुळे चर्चेत, वाचा ‘तारक मेहता’तील बबिताच्या आयुष्यातील खास गोष्टी

प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.