Heart Attack | पुनीत राजकुमारच नाही, तर फिटनेस फ्रिक असणाऱ्या ‘या’ कलाकारांचेही हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते फक्त 46 वर्षांचे होते. पुनीतची प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Heart Attack | पुनीत राजकुमारच नाही, तर फिटनेस फ्रिक असणाऱ्या ‘या’ कलाकारांचेही हृदय विकाराच्या झटक्याने निधन!
Raj-Puneeth
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 5:54 PM

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते फक्त 46 वर्षांचे होते. पुनीतची प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्कआउट करत असताना पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूड आणि टीव्हीमध्ये काम करणारे जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसबाबत खूप दक्ष असतात. जिममध्ये जाण्यापासून ते आपल्या आहाराची विशेष काळजी घेण्यापर्यंत सगळं करत असतात. एवढेच नाही तर हे स्टार्स वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्यायला विसरत नाहीत. पण अनेक वेळा मद्यपान, धुम्रपान, अयोग्य आहार तसेच अधिक जीम आणि व्यायामामुळे अनेक कलाकारांना हृदयविकाराचा सामना करावा लागला आहे. जाणून घेऊया अशा स्टार्सबद्दल जे फिटनेसफ्रिक असूनही, हृदयविकाराच्या झटक्याने झालेय निधन..

अबीर गोस्वानी

अबीर गोस्वानीला तुम्ही ‘प्यार का दर्द है मीठा-मीठा’, ‘कुसुम’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलं असेल. अबीर गोस्वानी यांनी मे 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला. त्यांचे वय अवघे 37 वर्षे होते. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते ट्रेडमिलवर धावत होते.

सिद्धार्थ शुक्ला

2 ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिद्धार्थ त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सावध असायचा आणि त्याने एकही दिवस जिममध्ये जाणे सोडले नाही. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

राज कौशल

अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज कौशल यांचे या वर्षी 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना रात्री अचानक छातीत दुखू लागलं आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते 50 वर्षांचे होते.

इंदर कुमार

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते इंदर कुमार यांनी वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 28 जुलै 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. खरं तर, 2011 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते हेलिकॉप्टरमधून थेट जमिनीवर पडले आणि इथूनच त्यांच्या आयुष्यात संकटांना सुरुवात झाली होती.

विनोद मेहरा

विनोद मेहरा यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. विनोद मेहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तेव्हा ते केवळ 45 वर्षांचे होते. विनोद मेहरा यांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 100 चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याच्या यशस्वी चित्रपटांमध्ये लाल पत्थर, अमर प्रेम, हिफाजत सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा :

Aryan Khan Bail | आर्यन खानचा जामीन आदेश जारी, तुरुंगाबाहेर येण्यासाठी मान्य कराव्या लागल्या ‘या’ अटी!

Shahrukh Khan Son : आर्यन खानला मिळाला जामीन, शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामने केलं असं सेलिब्रेशन, पाहा फोटो

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.